काही मिनिटं शिल्लक.. सर्व फिल्डर्स बॅट्समनच्या आजूबाजूला उभे केले अन्... मॅच फिरली! पाहा Video
All 11 Players Around Batter: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहेत. अगदीच रोमहर्षक पद्धतीने या सामन्याचा शेवट झाला.
All 11 Players Around Batter: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नचा मुलगा आर्ची वॉर्नने केलेल्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर कौंटी चॅम्पियनशीप क्रिकेट स्पर्धेमध्ये समरसेटच्या संघाने सुर्रेच्या संघावर विजय मिळवला. आर्चीने दोन सामन्यांमध्ये एकूण 11 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंड क्लब क्रिकेटमधील नावाजलेल्या कौंटी स्पर्धेतील हा विजय समरसेटने शेवटच्या 10 मिनिटांमध्ये अगदी रोमहर्षक पद्धतीने जिंकला. सध्या या विजयाचा क्षण दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
32 ओव्हर एकट्यानेच टाकल्या
18 वर्षीय आर्ची वॉर्न हा ऑफ स्पीनर आहे. तो या चॅम्पियनशीप स्पर्धेतील आपला केवळ दुसराच सामना खेळत होता. त्याने 32 ओव्हर गोलंदाजी केली. या 32 ओव्हरमध्ये केवळ 38 धावा देत आर्चीने 5 गडी तंबूत धाडले. यामुळे सुर्रेचा संघ 221 धावांचा पाठलाग करताना 109 धावांवर बाद झाला. समरसेटला मिळालेल्या या 111 धावांच्या विजयामुळे आता ते कौंटी चॅम्पियनशीपच्या शर्यतीत अधिक प्रबळ दावेदार झाले आहेत.
एकाच फ्रेममध्ये 14 जण
शेवटच्या दिवसाचा अवघ्या 10 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना विजयासाठी समरसेटला एका विकेटची गरज होती. त्यामुळेच काहीही करुन फलंदाजाला जाळ्यात अडकवण्यासाठी अगदीच भन्नाट फिल्डींग समरसेटनं लावली होती. तळाच्या फलंजाला पायचित किंवा बॅटची कड लागून झेलबाद करण्यासाठी तब्बल 9 खेळाडूंना त्याच्या आजूबाजूला अगदी जवळजवळ उभं करण्यात आलं होतं. या 9 जणांव्यतिरिक्त 1 गोलंदाज आणि 1 यष्टीरक्षक असे संघातील सर्व 11 जण अगदी दाटीवाटी केल्याप्रमाणे उभे असल्याचे दिसत होते. एवढ्या जवळ खेळाडू उभे असल्याने या 11 जणांबरोबरच एकाच फ्रेममध्ये दोन फलंदाज आणि पंच असे एकूण 14 जण दिसत होते.
...अन् सगळे सैरावैरा पळू लागले
गोलंदाजाने टाकलेला चेंडू खेळून काढण्याच्या नादात तो फलंदाजाच्या पॅडला लागला आणि एकाच वेळी सर्व 11 खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचं अपील केलं. पंचांनी बाद झाल्याचं दर्शवणारं बोट वर करताच श्रेरक्षण करणाऱ्या टीमचे सर्व खेळाडू आनंदाच्या भरात सैरावैरा पळू लागले.
1) क्रिकेट...
2) शेवटच्या दहा मिनिटांमध्ये...
हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विष ठरतोय.