मुंबई : शुक्रवार भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अतिशय सुखद होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या दोऱ्यातील कोणतीच सीरीज हरली नाही. टी 2- आंतरराष्ट्रीय सामन्यात 1-1 अशी बरोबर केली तर टेस्ट सिरीजमध्ये 2-1 ने विजय पटकावला. तसेच वन-डे सिरीजमध्ये विराट ब्रिगेडने 2-1 ने सामना आपल्या नावे केला. अशा पद्धतीने भारतीय संघाचा संपूर्ण प्रदर्शन हे चांगल होतं. असं सगळं असताना विराट कोहलीने अतिशय धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचा आतापर्यंतचा खेळ हा सगळ्याच क्रिकेट प्रेमींना सुखावणारा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मिळालं यश हे कौतुकास्पद आहे. एवढंच नव्हे तर कोहली मैदानावर आला की, तो धावा करणारच आणि वेगवेगळे विक्रम रचणार हा विश्वास आता चाहत्यांना आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक जुने रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड रचले आहेत, असं सगळं असताना विराट म्हणतो की, 'क्रिकेट हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं नाही'. 


विराट कोहलीच्या या विधानाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कोहलीने आपल्या पुढील 8 वर्षांचे प्लान शेअर केले आहेत. यावेळी कोहली म्हणाला की, 'एकदा निवृत्त झाल्यावर बॅट हातात घेणार नाही. क्रिकेट ही माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे पण क्रिकेटच माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे असं नाही.' 'माझ्यासाठी पत्नी अनुष्का आणि माझं कुटुंब हे सर्वात महत्वाचं आहे, असं विराट म्हणाला. निवृत्तीनंतर सर्वाधिक वेळ ही कुटुंबासोबत घालवणार आहे. कारण क्रिकेट हे माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, माझं आयुष्य नाही. 8 वर्षानंतर माझं कुटुंब माझ्यासाठी महत्वाचं', असल्याचं विराट म्हणाला. 


विराट कोहलीने आपल्या ऍपद्वारे एक व्हिडिओ क्लिप रिलीज केली आहे. यामध्ये याने हा खुलासा केला आहे. एवढंच नव्हे, तर पुढे विराट म्हणतो की, मला माहित आहे माझ्या या वाक्याला चाहते खूप गांभीर्याने घेतील. पण मी क्रिकेटला आपलं आयुष्य मानतं नाही याचा अर्थ असा नाही की, मी त्यासाठी समर्पित नाही, असं होत नाही.