डर्बन : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे कब्जा केलाय. ऑस्ट्रेलिया विजयापासून केवळ एक विकेट दूर आह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्वींटन डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक रंगली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झालाय. कसोटीच्या चौथ्या दिवसाला चहापानादरम्यान हा प्रकार घडलाय.


क्रिकेट ऑस्ट्रेलिया याप्रकरणी तपास करत आहेत. किंग्जटन, डर्बनमध्ये पहिल्या कसोटीतीली चौथ्या दिवशी जेव्हा क्रिकेटर टी ब्रेकसाठी पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते तेव्हा वॉर्नर आण डीकॉक यांच्यात छोटासा वाद झाला. 


यानंतर वॉर्नरने आपल्या संघातील सदस्यांना एका दिशेला जाण्यास सांगितले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय.



लंच आणि टीदरमयान ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज केवळ एका आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद करु शकले. डीकॉक आणि अॅडेन मार्काराम यांच्यात चांगली भागीदारी झाली. आफ्रिका ४१७ धावांच्या आव्हानाच्या जवळपास पोहोचत असताना ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शने मार्करामची विकेट घेत ऑस्ट्रेलियासाठी आव्हान सोपे केले. 


व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की वॉर्नर डीकॉक प्रचंड रागावलाय. डीकॉक आणि वॉर्नर यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचे व्हिडीओत दिसतेय. मात्र हा वाद कोणत्या गोष्टीमुळे झाला याचे संकेत सीसीटीव्ही फुटेजमधून मिळत नाहीयेत.