Australia vs Afghanistan Series: क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (Cricket Australia) अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानदरम्यान (Australia vs Afghanistan Series) मार्चच्या अखेरीस UAE मध्ये सीरिज खेळवली जाणार होती. पण ऑस्ट्रेलियाने या मालिकेला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फ्रेबुवारी महिन्यात भारत (Australia vs India) दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत दौऱ्यानंतर यूएईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसाय सामन्यांची मालिकाही खेळणार होते. पण तालिबानच्या काही निर्णयांना विरोध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मोठं पाऊल उचललं आहे. 


अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राज
अफागाणिस्तानमध्ये तालिबानी राज (Talibani Raj) आहे. त्यांच्या राज्यात महिला आणि मुलींना अनेक गोष्टींवर कठोर बंदी लावण्यात आली आहे. इथं मुलींना शिक्षण घेण्याचा तसंत घराबाहेर पडून काम करण्याचा अधिकार नाही. खेळातही महिलांवर अनेक बंधनं लादण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने तालिबानच्या या निर्णयाविरोधात क्रिकेट सीरिज खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. 


अफगाणिस्तानसहित जगभरातील महिला आणि पुरुषांना क्रीडा क्षेत्रात आणण्याबरोबरच त्यांचा विकास करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांच्या देशातील महिला आणि मुलींसंदर्भातली परिस्थिती चांगली व्हावी यासाठी सतत संपर्कात असल्याचंही क्रिकेट ऑस्ट्रोलियाने म्हटलं आहे. 


विशेष म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाला ऑस्ट्रेलियन सरकारनेही पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलचे (ICC) सीईओ Geoff Allardice यांनीही अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. अफगाणिस्तान असा एकमेव क्रिकेट संघ आहे ज्यांचा आयीसीसीमध्ये महिला क्रिकेट संघ नाही. 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका आयसीसी सुपर लीग अंतर्गत खेळवली जाणार होती. म्हणजे मालिका जिंकणाऱ्या संघाला एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये गुण मिळणार होते. पण आता ऑस्टेलियाने ही मालिका रद्द केलयाने मालिकेचे 30 टक्के गुण अफगाणिस्तानच्या खात्यात जमा होणार आहेत.