India Tour of West Indies : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर आता भारतीय संघ (Team India) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (West Indias Tour) रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडेच सोपवण्यात आलं आहे. एकदिवसीय संघात आयपीएलमध्ये चमकलेल्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 जुलैपासून सुरु होणाऱ्या विंडीज दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी सामने, तीन वन डे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. विशेष म्हणेज या दौऱ्यापासून भारताच्या पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात देखील होणार आहे. शिवाय या वर्षखेरीस भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यादृष्टीने खेळाडूंची चाचपणीही केली जाणार आहे. 


ऋतुराज आणि संजू सॅमसमनला संधी
रोहित शर्माबरोबर सलामीला शुभमन गिलला संधी देण्यात आली असून पुणेकर ऋतुराज गायकवाड आणि मिस्टर 360 सुर्यकुमार यादव यांना संधी मिळाली आहे. विकेटकिपर म्हणून ईशान किशनबरोबरच संजू सॅमसनला संघात घेण्यात आलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजच्या जोडीला उमरान मलिक आणि मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे. तर फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्यावर असणार आहे. 


12 जुलैपासून दौऱ्याला सुरुवात


वेस्ट इंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैला जोमिनिकात खेळवला जाईल तर दुसरा कसोटी सामना 20 जुलैला पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रंगेल त्यानंतर 27 जुलैपासून एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होईल. तर पाच मॅचची टी-20 सामने 3 ऑगस्टपासून खेळवले जातील


वेस्टइंडीज दौऱ्याचं वेळापत्रक
पहिली कसोटी सामना - 12 ते 16 जुलै, डोमिनिका
दुसरा कसोटी सामना - 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन


पहिला एक दिवसीय सामना - 27 जुलै, ब्रिजटाउन
दुसरा एक दिवसीय सामना- 29 जुलै, ब्रिजटाउन
तिसरा एक दिवसीय सामना- 1 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन


पहिला टी20 सामना - 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी20 सामना - 6 ऑगस्ट, गुयाना
तिसरा टी20 सामना - 8 ऑगस्ट, गुयाना
चौथा टी20 सामना - 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी20 सामना - 13 ऑगस्ट, फ्लोरिडा


असा आहे एकदिवसीय संघ
रोहिति शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयेदव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार