IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सोळावा हंगाम पूर्ण रंगात आला आहे. दहा संघांमध्ये आतापर्यंत 36 सामने खेळवले गेले आहेत. भारतासह परदेशातील अनेक दिग्गज खेळाडू (Internation Players) या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यादरम्यान काही मोजक्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरु आहेत. जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष आयपीएलवर (IPL 2023) लागलं आहे. यादरम्यान क्रिकेट जगतातन एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही खेळाडू टी20 लीग (T20 League) खेळण्यासाठी आपल्या देशाच्या संघाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटेनच्या द टाइम्स या पेपरने ही माहिती दिली असून इंग्लंडसह इतर काही देशांच्या क्रिकेटर्सशी आयपीएल संघमालकांनी संपर्क साधल्याचा दावा त्यांनी केला आहे. संघ आणि खेळाडूंमध्ये एक करारा केला जाणार असून या करारातंर्गत हे खेळाडू वर्षभर वेगवेगळ्या टी20 लागमध्ये खेळतील. पण त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे आपल्या देशाच्या संघाला कायमचं सोडावं लागणार आहे. 


इंग्लंड-ऑस्टेलियाचे खेळाडू?
इंग्लंडच्या काही खेळाडूंबरोबर आयपीएल फ्रँचाईजीने चर्चा सुरु केली आहे, यात काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सही आहेत जे सध्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टशी जोडले गेलेत. याशिवाय न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचे संघाच्या खेळाडूंशीही संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला आहे. 


जगभरात झटपट क्रिकेटचं पेव फुटलं असून क्रिकेट चाहत्यांकडूनही मोठी पसंती मिळत आहे. यातल्या अनेक टी20 लीगमध्ये आयपीएल फ्रँचाईजचा समावेश आहे. यात SA20, CPL, ILT20 आणि IPL या टी20 लीगचा समावेश आहे. दरम्यान रिपोर्टमध्ये कोणत्या फ्रँचाईजने कोणत्या खेळाडूंशी चर्चा सुरु केली आहे याची नावं दिलेली नाहीत. राष्ट्रीय क्रिकेट जगतातून काढता पाय घेण्यासाठी या खेळाडूंना तब्बल 5 मिलियन पाऊंड, म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण 50 कोटी रुपये इतकी दणदणीत ऑफर देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. जवळपास 10 आयपीएल संघ आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही विस्तारण्याची तयारी करत आहेत.


टी20 लीगमध्ये पैसाचपैसा
अनेक दिग्गज खेळाडू विविध देशांच्या क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतात. यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची कमाई होते. द टाइम्सने केलेल्या दाव्यानुसार खेळाडू आणि फ्रँचाईजीमध्ये असा करार झाला तर हे खेळाडू या T20 लीगमध्ये खेळताना दिसतील. त्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जाऊ शकते. क्रिकेट बोर्डाबरोबर ज्या खेळाडूंचा करार नाही त्या खेळाडूंसाठी ही ऑफर पैसाचपैसा देणारी ठरणार आहे.