R Ashwin: भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या 7 मार्चपासून पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. हा सामना धर्मशालेत रंगणार असून भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वाजात सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत टीम इंडिया पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर आर अश्विनच्या कामगिरीवरही भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर अश्विन रचणार इतिहास
धर्मशालेत आर अश्विन (R Ashwin) मैदानावर उतरताच त्याच्या नावावर नवा विक्रम जमा होणार आहे. भारत-इंग्लंडदरम्यानचा पाचवा कसोटी सामना रविचंद्रन अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नुकताच अश्विनने 500 कसोटी विकेटचा टप्पा पूर्ण केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने अनेक विक्रम रचले आहेत. 


अश्विन 14 वा भारतीय खेळाडू
अश्विनच्या कसोटी क्रारकिर्दीतील हा शंभरावा सामना असणार आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 14 वा खेळाडू असणार आहे. 


भारतासाठी 100 हून अधिका कसोटी सामने खेळणारे खेळाडू


सचिन तेंडुलकर - 200 सामने
राहुल द्रविड़ - 163 सामने
वीवीएस लक्ष्मण - 134 सामने
अनिल कुंबळे - 132 सामने
कपिल देव - 131 सामने
सुनील गावसकर - 125 सामने
दिलीप वेंगसरकर - 116 सामने
सौरव गांगुली - 113 सामने
विराट कोहली - 113 सामने
इशांत शर्मा - 105 सामने
हरभजन सिंह - 103 सामने
चेतेश्वर पुजारा - 103 सामने
वीरेंद्र सहवाग - 103 सामने


अश्विनची विक्रमी कामगिरी
अश्विन 37 वर्षांचा असून कसोटी क्रिकेटमध्ये 10 विकेट घेणारा तो सर्वात वयस्क भारतीय गोलंदाज आहे. अश्विनच्या नावावर कोणत्याही फिरकी गोलंदाजापेक्षा जास्त बोल्ड आणि एलबीडब्ल्यू आहेत. अश्विनने 101 वेळा क्लीन बोल्ड तर 113 वेळा एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. अश्विनने तब्बल 74 वेळा फलंदाजाला शुन्यावर बाद केलं आहे. या यादीत अनिल कुंबळे पहिल्या स्थानावर आहे. अनिल कुंबळेने 77 वेळा फलंदाजाला शुन्यावर बाद केलंय. अश्विनने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत फक्त 10 वेळा नो बॉल टाकले आहे. 


अश्विनने 44 कसोटी सामन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर गोलंदाजी करताना 170 विकेट घेतल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपधमध्ये 100 विकेट घेणारा अश्विन हा पहिला गोलंदाज आहे.