क्रिकेटमध्ये वादळ! 21 षटकार, 33 चौकार, 147 चेंडूत ट्रिपल सेंच्युरी...कोण आहे हा खेळाडू?
Cricket Record : क्रिकेटच्या मैदानावर आलेल्या तन्मय अग्रवाल नावाच्या वादळात विरुद्ध संघाचा पालापाचोळा झाला. या युवा खेळाडूने अवघ्या 141 चेंडूत तिहेरी शतक ठोकलं. सर्वात वेगवान ट्रिपल सेंच्युरी करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
Cricket Record : देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत अरुणाचल प्रदेश क्रिकेट संघाचा (Arunachal Cricket Team) खेळाडू तन्मय अग्रवाल वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा (Brian Lara) 501 धावांचा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. तन्मय अग्रवालने (Tanmay Agarwal) हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात अवघ्या 160 धावात 21 षटकार आणि 33 चौकारांच्या मदतीने नाबात 323 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमधये सर्वात वेगवन तिहेरी शतक करणरा तन्मय हा पहिला खेळाडू ठरला आहे. तन्मयने 147 चेंडूत 300 धावा पूर्ण केल्या.
त्याआधी 119 चेंडूत तन्मयने दुहेरी शतक लगावलं. यात त्याने 21 षटकार ठोकले होते. रणजी ट्ऱॉफी स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही तन्मयच्या नावावर जमा झाला आहे. अरुणाचल प्रदेश आणि हैदराबाद संघादरम्यान सुरु असलेल्या रणजी सामन्यच्या पहिल्या दिवसावर केवळ तन्मयचं वर्चस्व होतं. सलामीला आलेल्या तन्मयने सुरुवातच आक्रमक केली. अरुणाचलचा कर्णधार राहुल सिंग यानेही तन्मयला जबरदस्त साथ दिली. राहुल सिंगने अवघ्या 105 चेंडूत 3 षटकार आणि 23 चौकारांच्या मदतीने 185 धावा केल्या. राहुल आणि तन्मयने पहिल्या विकेसाठी 345 धावांची पार्टनरशिप केली.
सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अरुणाचल प्रदेशने 1 विकेट गमावत 529 धवा स्कोअर बोर्डवर लावल्या होत्या. तन्मय अद्याप खेळपटटीवर उभा असून 323 धावांवर तो नाबाद आहे.
ब्रायन लाराचा विक्रम मोडणार?
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम वेस्टइंडिजया महान फलदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नाबाद 501 धावा केल्या होत्या. अरुणाचल प्रदेश क्रिकेट संघाचा सलामीवीर तन्मय अग्रवाल दुसऱ्या दिवसाच्या खेळात हा विक्रम मोडणार का याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे. तन्मयचा फॉर्म पाहात ब्रायन लाराचा विक्रम तो मोडू शकतो अशी अपेक्षा क्रिकेट चाहते व्यक्त करतायत.
मुंबईची खराब सुरुवात
रणजी ट्रॉफी स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबई क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. मुंबईचा संघ पहिल्या दिवसात 59.2 षटकात केवळ 198 धावांवर ऑलाऊट झाला. शम्स मुलानी याच्या 57 धावा वगळता मुंबईच्या एकाही फलंदाला मोठी धावसंख्या करता आली नाही. उत्तर प्रदेशच्या अंकित राजपूत आणि आकिब खानने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. भूवनेश्वर कुमार आणि शिवम शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पहिल्या दिवसाअखेर उत्तर प्रदेशने 1 विकेट गमावत 53 धावा केल्या आहेत.