मुंबई : खेळण्याची जिद्द असेल तर वाढत्या वयासोबत शरीरही तेवढंच साथ देतं. कितीही संकट आली तरी मन खंबीर असेल तर काहीच अशक्य नाही हे संपूर्ण जगाला ज्याने दाखवून दिलं आज तोच माजी क्रिकेटपटू जीवन मरणाची झुंज देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 44 व्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीमचं प्रतिनिधित्व एकेकाळी त्यांनी करून संपूर्ण जगाला आपल्या फिटनेस आणि मनाची ताकद दाखवून दिली होती. 


माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि नेदरलँड पुरुष टीमचे मुख्य कोच रायन कॅम्पबेल (Ryan Campbell) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत थोडा उशीर झाला.


50 वर्षीय रायन कोमात गेले आहेत. ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत आहेत. 


कोण आहेत रायन?


Ryan Campbell हे ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग दोन्ही टीमकडून खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ते 2 सामने खेळले आहेत. 2017 मध्ये त्यांनी हाँगकाँग टीममधून पदार्पण केलं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये हाँगकाँगचं प्रतिनिधित्व करणारे 44 वर्षांचे ते एकमेव वयस्कर खेळाडू होते.