IPL 2024 : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, एकही सामना दिल्लीत होणार नाही... कारण
DC IPL schedule 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्या खेळवला जाणार आहे. पण जाहीर झालेल्या वेळापत्रकात दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे.
DC IPL schedule 2024 : 10 शहरं, 17 दिवस आणि 21 सामने... इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर (IPL Schedule 2024) करण्यात आलं आहे. 22 फेब्रुवारीला बीसीसीआयने (BCCI) वेळापत्रक जाहीर केलं. पहिल्या टप्प्यात 17 दिवसांचं वेळपत्र देण्यात आलं आहे. पहिला सामना आयपीएल 2023 चा विजेता संघ महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान (RCB) होणार आहे. 22 मार्चला चेन्नईतल्या चेपॉक स्टेडिअमध्ये सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का
बीसीसीआयने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकानुसार दिल्ली कॅपिटल्स संघ आपलं होम ग्राऊंड असलेल्या दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर एकही सामना खेळू शकणार नाही. यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. कारण दिल्लीकरांना एकही सामना दिल्लीत पाहाता येणार नाही.
पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स एकूण पाच सामने खेळणार आहे. दिल्लीच्या मिशन आयपीएलची सुरुवात 23 मार्चपासून होईल. पहिला साना पंजाब किंग्सविरुद्ध रंगणार आहे. हा सामना मोहालीत खेळला जाणार आहे. यानंतर 28 मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध, तिसरा सामना 31 मार्चला चेन्नईविरुद्ध, 3 एप्रिलला केकेआरविरुद्ध आणि 7 एप्रिलला मुबंईविरुद्ध दिल्ली खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 31 मार्च आणि 3 एप्रिलचे सामने विशाखापट्टणमध्ये खेळवले जाणार आहेत.
सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार अरुण जेटली मैदानाऐवजी दिल्ली कॅपिटल्सचं VDCA क्रिकेट मैदान हे होमग्राऊंड असणार आहे.
यामुळे दिल्लीत होणार नाहीत सामने
23 फेब्रुवारीपासून महिला प्रीमिअर लीगला सुरुवात होतेय. यातले काही सामने दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. डब्ल्यूपीएलचा अंतिम सामनाही दिल्लीत खेळवला जाणार आहे. अशात डब्ल्यूपीएलनंतर लगेच आयपीएल सामने खेळवण्यास दिल्ली क्रिकेट असोसिशनला वेळ लागणार आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकही तोंडावर आहे. राजकारणाचं प्रमुख केंद्र दिल्ली असल्याने दिल्लीत सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होणआर आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे सामने विशाखापट्टणममध्ये रंगणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ
ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, विक्की ओस्तवाल, कुमार कुशाग्र, सुमित कुमार, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, झाय रिचर्डसन, हॅरी ब्रूक, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, खलील अहमद, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, यश ढुल, स्वास्तिक छिकारा, रिकी भुई, रसिख डार, प्रवीण दुबे, मुकेश कुमार..