भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन ठरली, दिग्गज खेळाडूलाच केलं बाहेर
IND vs ENG 4th Test Playing 11: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
England Playing 11 vs India 4th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला चौथा कसोटी सामना शुक्रवार म्हणजे 23 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेत टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथा कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यानचा चौथा कसोटी (India vs Englad 4th Test) सामना रांचीतल्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडिअम खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजात सामन्याला सुरुवात होईल.
प्लेईंग इलेव्हनची घोषणा
चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची (England Playing Eleven) घोषणा केली आहे. इंग्लंड संघात ऑफ स्पीनर शोएब बशीरचं पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनलाही संधी देण्यात आली आहे. तर फिरकी गोलंदाज रेहान अहमद आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड यांना डच्चू देण्यात आला आहे. चौथ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचा इंग्लंड संघाचा प्रयत्न असेल.
खराब फॉर्ममध्ये असलेल्या जन बेअरस्टोलाही पुन्हा एकदा संघात संधी मिळालीय. तर सीनिअर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननलाही प्लेईंग इलेव्हनमध्ये कायम ठेवलं आहे. जॅक क्रॉली आणि बेन डकेट इंग्लंडच्या डावाची सुरुवात करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर ओली पोप आणि चौथ्य क्रमांकावर माजी कर्णधार जो रुट फलंदाजीसाठी उतरेल. इंग्लंड संघात फिरकी गोलंदाजीची मदार टॉम हार्टले आणि शोएब बशीर यांच्यावर असणार आहे. तर तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून जो रुट जबाबदारी सांभाळेल. वेगवान गोलंदाजीची मदार जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सनवर असेल.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कप्तान), जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, शोएब बशीर, ओली रॉबिन्सन और जेम्स एंडरसन.
रांचीत टीम इंडियाचा दमदार रेकॉर्ड
रांचीतल्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड दमदार आहे. या मैदानावर टीम इंडियाने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 विकेट गमावत 603 धावांचा डोंगर उभा केला होता. तर 2019 मध्ये या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने निचांकी धावसंख्या केली होती. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 133 धावांवर ऑलआऊट झाला होता. या मैदानावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने विक्रम रचला आहे. रोहित शर्माने 212 धावांची खेळी केली होती. तर पुजराने 202 धावा केल्या होत्या.