Gautam Gambhir: `विदेशी कोच भारतात येतात, पैसे कमवतात अन्...`; गंभीरला नेमकं म्हणायचंय काय?
Gautam Gambhir on Indian Cricket Coaching: भारतीय क्रिकेटही एक भावना आहे. ही भावना फक्त एक भारतीय समजू शकतो, असं गंभीर म्हणतो.
Gautam Gambhir on Foreign coaches: गेल्या अनेक वर्षापासून टीम इंडियाच्या (Team India) प्रशिक्षकांवरून (Coach) मोठा वाद समोर येतो. प्रत्येकवेळी विदेशी कोच (Foreign coaches) नसावा, अशी मागणी अनेक क्रिकेटर करतात. अशातच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पुन्हा एकदा विदेशी प्रशिक्षकांना टीम इंडियात सामील करण्याच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलंय. परदेशी खेळाडूंवर पैसे खर्च करण्यापेक्षा भारताच्या एखाद्या रिटायर्ड खेळाडूला कोच (Team India Coach) म्हणून नियुक्त करावं, अशी मागणी गंभीरने केली आहे.
गौतम गंभीरने बुधवारी स्वत:च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून (Gautam Gambhir Instragram) एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. भारतातील परदेशी प्रशिक्षक केवळ चांगले पैसे कमवण्यासाठी भारतात येतात आणि नंतर कमाई करून गायब होतात, असं गंभीर या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय. भारत एक भावना आहे. भारतीय क्रिकेट (Cricket) ही देखील एक भावना आहे. ही भावना फक्त एक भारतीय समजू शकतो, असंही गंभीर म्हणतो.
आणखी वाचा - Ricky Ponting : लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान रिकी पॉण्टिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
गेल्या 6 ते 7 वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे भारतीयांनी टीम इंडियाला कोचिंग देण्यास सुरुवात केली. ज्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलंय तेच लोक भारतीय क्रिकेट किंवा भारतीय खेळांबद्दल उत्सुक असतात, असंही गंभीर (Gautam Gambhir on Foreign coaches) म्हणाला आहे.
पाहा Video -
दरम्यान, आपल्या वक्तव्यात गंभीरने अनिल कुंबळे, रवी शास्त्री आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचं कौतूक देखील केलंय. प्रशिक्षकात सर्वात जास्त राहुल द्रविड इमोशनल राहिला असेल. मला देखील भारतीय प्रशिक्षकाच्या टीमसोबत खेळण्याची संधी मिळायला पाहिजे होती, अशी खंत देखील गंभीरने यावेळी व्यक्त केली आहे. गंभीर आयपीएलमध्ये लखनऊच्या संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळतो. त्यामुळे द्रविडनंतर गंभीर का?, असा सवाल हळू आवाजात क्रिडाविश्वात विचारला जातोय.