Highest T20I Score Record : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका संघालाही जमलं नाही ते तळाच्या एका संघाने करुन दाखवलं आहे. टी20 क्रिकेटमध्य सर्वाधिक धावसंख्याचा नवा विक्रम प्रस्तापित झाला आहे. अवघ्या 120 चेंडूत 344 धावा ठोकण्यात आल्यात. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध 297 धावांचा डोंगर उभा केला होता. टी20 क्रिकेटमध्ये हा दुसरा सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. पम अवघ्या 11 दिवसात नवा विक्रम रचला गेला आहे. ही न भूतो न भविष्यतो कामगिरी केली आहे झिम्बाब्वे क्रिकेट संघाने. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या झिम्बाब्वेने गाम्बिया संघाविरुद्ध 20 षटकात 344 धावा करत टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास लिहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा नेपाळ क्रिकेट संघाच्या नावावर होता. नेपाळे मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या. पण हा विक्रम आता मागे पडला आहे. केनियाची राजधानी नैरोबीत टी20 वर्ल्ड कपच्या आफ्रिका सब रिझन पात्रतेसाठी सामने खेळवले जात आहते. या स्पर्धेत 23 ऑक्टोबरला झिम्बाब्वे आणि गाम्बिया क्रिकेट संघ आमने सामने होते. झिम्बाब्वेच्या तुलनेत गाम्बिया संघ अगदीच नवखा आहे. या सामन्यात झिम्बाब्वे विजयी होणार हे जवळपास निश्चित होतं, पण झिम्बाब्वेने केवळ विजयच नोंदवला नाही तर नवा विक्रमही प्रस्तापित केला.


सिंकदर रझाचं विक्रमी शतक
झिम्बाब्वेने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या जवळपास प्रत्येक फलंदाजाने धावांची बरसात केली. सलामीला आलेल्या ब्रायन बेनेट आणि टी मारुमानी या जोडीने पहिल्या 5.4 षटकातच 98 धावा कुटल्या. मारुमानीने केवळ 19 चेंडूत 62 धावा केल्या. तर बेनेटने 26 चेंडूत अर्धशतक झळकावलं. पण झिम्बाब्वेच्या विक्रमी विजयाचा हिरो ठरला तो कर्णधार सिकंदर रझा. सिकंदर रझाने चौकार-षटकारांची आतषबाजी करत संघाला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. 



सिकंदरने केवळ 33 चेंडूत शतक पुर्ण केलं. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेगवान शतकाचा हा नवा विक्रम आहे. त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा विक्रमही मागे टाकलया. रोहित आणि मिलरच्या नावावर 35 चेंडूत शतकाची नोंद आहे. सिंकदरने क्लाईव्ह मडांडेबरोबर भागिदारी करत 40 चेंडूत 141 धावा केल्या. या दोघांच्या फटेकबाजीमुळे झिम्बाब्वेने 20 षटकात 344 धावा केल्या. 


सर्वाधिक षटकारांचा विक्रम
केवळ सर्वाधिक धावा आणि वेगवान शतकांचा नाही तर या सामन्यात सर्वाधिक षटकारांचाही विक्रम मोडला गेला. कर्णधार सिंकदर रझाने सर्वाधिक 15 षटकार लगावले. तर 7 चौकारही मारले. मडांडेने 5 षटकार ठोकले तर मारुमानीने 4 षटकार लगावले. झिम्बाब्वेने या सामन्यात एकूण 27 षटकार मारले. याआधी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम नेपाळच्या नावावर होता. त्यांनी एका सामन्यात 26 षटकार लगावले होते.