Indian Cricket Team: टीम इंडियात (Team India) पदार्पण करण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूचं एक स्वप्न असतं. आपण देशासाठी खेळावं, मोठमोठे रेकॉर्ड करावेत, संघाला जिंकून द्यावं अशी प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. शहरापासून अगदी देशातल्या खेड्यापाडयातील हजारो खेळाडू यासाठी जीवतोड प्रयत्न करत असतात. यातल्या काही जणांचं स्वप्न पूर्णही होतं. भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही काळात अशा खेळाडूंचं पदार्पण झालं आहे, जे छोट्या शहरातून किंवा खेडेगावातून आले आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी टीम इंडियाचं दरवाजा ठोठावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाडफाड इंग्रजीत मुलाखत
टीम इंडियात प्रवेश केल्यानंतर अनेकवेळा क्रिकेटपटू चांगली कामगिरी करतात आणि मग त्यांची मुलाखतही घेतली जाते. अशा वेळी कमी शिकलेले खेळाडूही अगदी फाडफाज इंग्लिश (English) बोलताना दिसतात. अशावेळी प्रश्न पडतो हे खेळाडू इतकं अस्खलित इंग्रजी बोलतात तरी कसे. काही खेळाडूंचं शिक्षण दहावी तर काही खेळाडूंच शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे. 


खेळाडू इंग्रजी कसं बोलतात?
भारतीय संघात पदार्पण झाल्यानंतर खेळाडूंच्या सरावाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक विकासावरही भर दिला जातो. यासाठी खेळाडूंना विशेष ट्रेनिंगचं आयोजन केलं जातं. परदेशात गेल्यानंतर खेळाडूंना संवाद साधताना कोणतीही अडचण येऊ नये हा या मागचा उद्देश असतो. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोणी (MS Dhoni), असो की धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) असो. अगदी गावखेड्यातून आलेला प्रवीण कुमारलाही (Prvain Kumar) सुरुवातीला इंग्रजी भाषेचं वावडं होतं. पण आता त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवलं आहे. 


इतकंच नाही तर आता भारतीय संघात असलेले मोहम्मद शमी (Mohammed Shami), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) किंवा कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचंही इंग्रजी सुमार होतं. पण आता पत्रकार परिषद असो की सामना संपल्यानंतरची मुलाखत असो, अगदी आत्मविश्वासाने हे खेळाडू इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसतात. 


बीसीसीआयतर्फे अशा खेळाडूंवर विशेष लक्ष दिलं जातं. खेळाडूंसाठी पर्सनालिटी डेव्हलपमेंट (Personality Development) आणि इंग्लिश स्पिकिंग कोर्सचं आयोजन केलं जातं. मैदानाबरोबरच खेळाडू मैदानाबाहेरही आपल्या वैयक्तिक विकासाठी मेहनत करताना दिसतात. परदेशात सामन्याव्यतिरिक्त खेळाडूंसाठी कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. यात परदेशी पाहुण्यांशी संवाद साधताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बीसीसीआय खेळाडूंवर विशेष मेहनत घेतं.