T20I Cricketer of the Year : टी20 क्रिकेटचा स्पेशलिस्ट मिस्टर 360 सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सलग दुसऱ्या वर्षी टी20 क्रिकेटर ऑफ द इयरचा (T20 Cricketer of the Year) पुरस्कार पटकावला आहे. आयसीसीने वर्ष 2023 साठी सूर्यकुमार यादवची टी20 आंतरराष्ट्रीय सर्वश्रेष्ठ क्रिकेट म्हणून निवड केली आहे. याआधी 2022 मध्येही सूर्यकुमार यादवने हा पुरस्कार पटकावला होता. सलग दोन वेळा टी20 क्रिकेटर ऑफ इयरचा पुरस्कार पटकाणवारा सूर्यकुमार हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमार यादवबरोबर या शर्यतीत झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, न्यूझीलंडचा मार्क चॅपमॅन आणि युगांडाचा अल्पेश रमजानी यांचाही समावेश होता. या शर्यतीत सूर्याने या तिघांना मागे टाकत बाजी मारली आहे. 2023 या वर्षात सूर्यकुमारने 150 च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज
2023 या वर्षात टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने 18 टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 155.95 च्या स्ट्राईक रेटने 733 धावा केल्या. यात सूर्यकुमार यादवने दोन शतकं आणि पाच अर्धशतकंही ठोकली. सूर्यकुमार यादव टी20 चा स्पेशलिस्ट फलंदाज मानला जातो. त्याने भारतासाठी आतापर्यंत 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1248 धावा केल्या आहेत. यात 4 शतकं आणि तब्बल 17 अर्धशतकांचा समावेश आहे. 


टी20 संघाचा कर्णधार
त्याआधी आयसीसीने 2023 वर्षातील सर्वोत्त टी20 संघाची घोषणा केली होती. या संघाचं कर्णधारपदही सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं होतं. या संघात भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यात टीम इंडियाचा युवा आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वाल, फिरगी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा समावेश करण्यात आला होता. भारतीय खेळाडू व्यतिरिक्त फिल सॉल्ट याचा देखील समावेश आहे. तर वेस्ट इंडिजचा स्टार निकोलस पुरन याचं देखील नाव आहे. तसेच न्यूझीलंडचा मार्क चेपमॅनचा देखील संघात समावेश आहे. झिब्बॉव्वेचा सिकंदर राजा आणि रिचर्ड नगावारा यांचं नाव समील आहे. तर आयर्लंडचा मार्क अडियर याचं नाव देखील आहे. 


महिला क्रिकेटमध्ये हिली मॅथ्यूज
महिला क्रिकेटमधअये वेस्ट इंडिजच्या हिली मॅथ्यूजनला टी20 वूमन क्रिकेटर ऑफ द ईअरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मॅथ्यूज टी20 प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार जिंकणारी वेस्टइंडिजची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. 2023 मध्ये हिली मॅथ्यूजने दमदार कामगिरी केली होती. 


आयसीसी सर्वोत्तम टी20 संघ (2023)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, फिल सॉल्ट, मार्क चेपमॅन, निकोलस पुरन (विकेटकिपर), रवी बिश्नोई, सिकंदर राजा, रिचर्ड नगावारा, मार्क अडियर, अल्पेश राममानी, अर्शदीप सिंग.