ICC announced Mens Test Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने (ICC) वर्ष 2023 च्या सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली आहे. वर्षभरात उत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना आयसीसीच्या संघात स्थान दिलं जातं. अशातच आता मागील वर्षीच्या बेस्ट संघात भारताच्या दोन खेळाडूंना संधी मिळाल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडियाची फिरकी जोडी म्हणजेच रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) आणि रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) यांना संघात स्थान मिळालं आहे. तर ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) टीमचा कॅप्टन करण्यात आलंय. संघात कोणाला कोणाला संधी मिळाली पाहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याला सलामीवीर म्हणू संघात संधी मिळालीये. तर श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने याला देखील सलामी जोडीदार म्हणून संघात जागा मिळालीये. न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला जागा मिळाल्याचं बोललं जातंय. तर दुखापतीमुळे सध्या टीममधून आत बाहेर होणाऱ्या केन विलियम्सन (Kane Williamson) याला देखील संधी मिळालीये. त्याच्या खांद्यावर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल.


केन विलियम्सननंतर इंग्लंडच्या बॅकबोन अशा जो रूटने (Joe Root) सातत्य राखत पुन्हा एकदा टेस्ट टीममध्ये संधी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाला महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या ट्रेविस हेडला (Travis Head) देखील जागा देण्यात आलीये. तर फिरकीच्या डिपार्टमेंटमध्ये रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) प्राधान्य देण्यात आलंय. त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीमुळे त्याला जागा मिळालीये. तर ऑस्ट्रेलियाला अॅलेक्स कॅरी (Alex Carey) याला विकेटकिपर म्हणून स्थान देण्यात आलंय.



फास्टर गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) कॅप्टन करण्यात आलंय. त्याने 11 टेस्ट सामन्यात 42 विकेट्स मिळण्याची किमया करून दाखवली होती. जडेजाच्या जोडीला आश्विलला (Ravichandran Ashwin) देखील संधी मिळाली. 4 सामन्यात 25 विकेट्स आश्विनने घेतले आहेत. कमिन्सनंतर मिशेल स्टार्कला (Mitchell Starc) देखील संधी मिळाली आहे. तर आपल्या अफलातून करियरला रामराम ठोकणाऱ्या इंग्लंडच्या स्टुअर्ड ब्रॉडला (Stuart Broad) देखील आयसीसीच्या संघात जागा मिळाली आहे.