ICC ODI World Cup 2023 : भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातील (ODI WC 2023) सर्व दहा संघ अखेर निश्चित झाले आहेत. विश्वचषकात खेळणारा दहावा संघ म्हणून नेदरलँड (Netherland)  संघाचा प्रवेश झाला आहे. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नेदरलँडने वर्ल्ड कप क्वालिफायर राऊंडमध्ये स्कॉटलंडचा (Scotland) चार विकेट राखून पराभव केला आणि मोठ्या थाटात विश्वचषक स्पर्धेत एन्ट्री केली. स्कॉटलंडने नेदरलँडसमोर विजयासाठी 44 षटकात 278 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण नेदरलँडने 42.5 षटकातच हे आव्हान पार केलं. नेदरलँडच्या विजयाचा हिरो ठरला तो बास डी लीडे. अष्टपैलू डी लीडेने अवघ्या 92 चेंडूत 123 धावा केल्या. यात सात चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. डी लीडेने गोलंदाजी करताना स्कॉटलंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषचकातले दहा संघ
एकदिवसीय विश्व चषक 2023 मध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत. यात यजमान भारताशिवाय, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. तर दोन संघांचा क्लालिफायर राऊंडमध्ये निकाल लागणार होता. क्वालिफायरमध्ये श्रीलंका आणि नेदरलँडने प्रवेश केला आहे. 


विश्वचषक क्वालिफायर राऊंडमध्ये एकूण दहा संघ खेळले. यात ग्रुप ए मधून झिम्बाब्वे, नेदरलँड आणि वेस्टइंडिजने तर ग्रुप बीमधून श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान संघाने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला. पण सुपर सिक्समध्ये बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभव पत्करावा लागला. विश्वचषक इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज संघ खेळणार नाहीए. 


श्रीलंका-नेदरलँडमध्ये अंतिम सामना
सुपर सिक्सच्या अंतिम सामन्यात आता श्रीलंका आणि नेदरलँडमध्ये एकमेकांना भिडेल अंतिम सामन्यात विजेता संघ क्वालिफायर-1 म्हणून तर उपविजेता संघ क्वालिफायर-2  म्हणून खेळेल. दरम्यान विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक संघाचे 9 सामने असतील. दरम्यान, विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल.


भारतीय संघाचे सामने
8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया , चेन्नई 
11  ऑक्टोबर vs अफगाणिस्तान  दिल्ली
15 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबरvs न्यूजीलँड, धरमशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2  नोव्हेंबर vs क्वालिफायर 2 (श्रीलंका/नीदरलँड), मुंबई
5 नोव्हेंबर vs साउथ अफ्रीका, कोलकाता
11 नोव्हेंबर vs क्वालिफायर 1 (श्रीलंका/नीदरलँड) , बंगळुरु