ICC Ranking: इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने (ICC) एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी (ODI ICC Ranking) जाहीर केली आहे. यात टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंचाच बोलबाला दिसतोय. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील (India vs Sri Lanka ODI) शतकाचा विराट कोहलीला बम्पर फायदा झालाय (Virat Kohli ODI Century). एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो टॉप टेनमध्ये पोहोचलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला शतकाचा फायदा
भारत आणि श्रीलंकेदरम्यान गुवाहाटीमध्ये (Guwahati) पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. यात भारताने श्रीलंकेवर 67 धावांनी मात करत नव्या वर्षाची विजयाने सुरुवात केली. या सामनात विराट कोहलीने शानदार शतक ठोकलं. विराटने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधलं विराटचं हे 45 शतकं होतं तर क्रिकेट कारकिर्दीतलं हे 73वं शतक होतं. या खेळीमुळे विराट कोहीलने आयसीसी क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. क्रमवारीत विराट आता सहाव्या स्थानावर आहे. (Virat Kohli 45 Century in One Day International Cricket)


रोहित शर्मा टॉप टेनमध्ये
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही दमदार बॅटिंग केली. अवघ्या 67 चेंडूत त्याने 83 धावा केल्या. या खेळीमुळे रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. रोहित शर्मा आता आठव्या स्थानावर पोहोचलाय. 


स्मिथ आणि  बेअरस्टोला नुकसान
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोची या क्रमवारीत घसरण झाली आहे. स्टिव्ह स्मिथची एका स्थानाने घसरण होऊन सातव्या नंबरवर पोहोचलाय. तर बेअरस्टोची दोन स्थानांनी घसरण होऊन नवव्या क्रमांकावर पोहोचलाय. याशिवाय फलंदाजी टॉप 10 मध्ये मोठे बदल झालेले नाहीत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 891 पॉईंटसह अव्वल स्थानावर कायम आहे. 


हे ही वाचा : Guess Who: स्कूल युनीफॉर्ममध्ये दात दाखवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं? सध्या तिच्याच बोल्डनेसची चर्चा


गोलंदाजीत सिराजची झेप
गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सिराडने दोन विकेट घेतल्या. याचा त्याला क्रमवारीत फायदा झाला. सिराजने 4 स्थानांची झेप घेतली असून तो 18 व्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे सिराजने जसप्रीत बुमरहालाही मागे टाकलं आहे. बुमराह 19 व्या स्थानावर घसरला आहे.