Guess Who: स्कूल युनीफॉर्ममध्ये दात दाखवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं? सध्या तिच्याच बोल्डनेसची चर्चा

Celeb Childhood Photo: सोशल मीडियावर (Social Media) बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक कलाकारांच्या लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. यात अनेकवेळा या कलाकारांना ओळखणं शक्य होतं, तर काही वेळा कितीही विचार केला तरी त्यांना ओळखणं अवघड होऊन बसतं. सध्याच सोशल मीडियावर अशाच एका कलाकाराचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटो त्या अभिनेत्रीचा आहे जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. आपल्या चित्रवित्रीत कपडयांमुळे तिच्यावर नेहमीच कॅमेरे रोखलेले असतात. जाणून घेऊन स्कूल यूनीफॉर्ममध्ये (School Uniform) व्हायरल होणारा या फोटोचील अभिनेत्री आहे तरी कोण?

Jan 11, 2023, 15:16 PM IST
1/6

स्कूल यूनीफॉर्मवर असलेल्या या लहान मुलीचा फोटो सध्या सोशल मीडिआवर वेगाने व्हायरल होत आहे. सध्या ही मूलगी आपल्या बोल्ड कपड्यांमुळे आणि बिनधास्त स्वभावामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्रीच्या कपड्यांच्या चर्चा दूर दूरपर्यंत पसरल्या आहेत. 

2/6

स्कूल यूनीफॉर्ममध्ये असणाऱ्या या गोंडस मुलीचं नाव आहे उर्फी जावेद (Uorfi Javed). बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या आणखी एका कारणाने चर्चेत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिसेल तिथे थोबडवण्याचा इशारा दिला आहे. याला उत्तर म्हणून उर्फी जावेदनेही ट्विट करत तीला डिवचलं.

3/6

उर्फी जावेदने काही टीव्ही मालिकेतही काम केलं आहे. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती तिच्या अंतरंग कपड्यांमुळे. कपड्यांबरोबरच उर्फी आपल्या बेताल वक्तव्यानेही नेहमीच चर्चेत असते. दररोज ती कोणतं न कोणतं वक्तव्य करते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल होत असतं.

4/6

एका मुलाखतीत उर्फीने धक्कादायक माहिती दिली होती. वडिलांनीच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तीने म्हटलं. तसंच 11 वीत असताना तिचा एक फोटो अॅडल्ट वेबसाईटवर टाकण्यात आला होता, पण याप्रकरणी तिला कुटुंबाची साथ मिळाली नाही, असं तीने या मुलाखतीत सांगितल होतं.

5/6

लखनऊमधल्या गोमतीनगर इथं उर्फीचा जन्म झाला. तिचं महाविद्यालयापर्यंतच शिक्षण लखनऊमध्ये झालं. तीने मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यानंतर ती दिल्लीत एका फॅशन डिझायनरकडे असिस्टंट म्हणून काम करत होती.

6/6

मुंबईत आल्यानंतर तीने मॉडलिंग क्षेत्रात आपलं करियर करण्याचं ठरवलं. अनेक फॅशन शोमध्ये तीन भाग घेतला आहे. 'टेढी मेढी फॅमिली' या मालिकेद्वारे तीन टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला. अनेक ब्रँडचंही सध्या ती प्रमोशन करते. तीचं सघ्याचं उत्पन्न जवळपास 40 ते 55 लाख इतकं असून मुंबईत तिचा अलिशान फ्लॅटही आहे.