World Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! `या` तारखेला जाहीर होणार वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक
World Cup Schedule : क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
ODI World Cup-2023 Full Schedule : जगभरातील क्रिकेट प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहातात ती एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक (ODI World Cup 2023) स्पर्धा यंदा भारतात (India) खेळवली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या स्पर्धेचं वेळापत्रक (WC Schedule) अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. आता वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या झिम्ब्बाब्वेमध्ये विश्व चषक पात्रता फेरी खेळवली जात आहे.
या तारखेला वेळापत्रक होणार जाहीर
विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये 10 संघ सहभागी होमार आहेत. यातले 8 संघ निश्चित झाले आहेत. तर 2 संघ पात्रता फेरीतून अंतिम दहामध्ये प्रवेश करतील. येत्या 27 जूनला म्हणजे मंगळवारी या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. यासाठी मुंबईत (Mumbai) एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
यामुळे झाला उशीर
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा यंदा भारत आयोजक आहे. पण भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) तणाव सुरु असल्याने विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात उशारी झाल्याचं सांगितलं जातंय. पण आता आयसीसीकडून (ICC) स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. एकदिवसीय एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे.
त्याआधी पाकिस्तानमध्ये एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण बीसीसीआयने भारत पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याची कठोर भूमिका घेतली. त्यानंतर या स्पर्धेतले काही सामने पाकिस्तानबरोबर श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. भारताने कठोर भूमिका घेतल्याने पाकिस्ताननेही एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेत न खेळण्याची धमकी दिली होती.
असं असेल संभाव्य वेळापत्रक
संभाव्या वेळापत्रकानुसार एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होईल. पहिल्या सामन्यात अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड उपविजेत्या न्यूझीलंडमध्ये खेळवला जाईल. उपांत्येफीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर होईल. सेमीफायनलच्या सामन्यांचं ठिकाण निश्चित झालेलं नाही. टीम इंडिया या स्पर्धेत 9 सामने खेळेल. भारताच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होण्याची शक्यताआहे. याआधी 2011 मध्ये भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा भारतात होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडिया किमया करणार का याकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.