India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिला एकदिवसीय सामना 17 डिसेंबरला जोहान्सबर्गमधल्या न्यू वॉनडर्स स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. तीम सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने (Team India) विजयी सलामी दिली. यजमान दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. या सामन्यात पराभव पत्करावा  लागला असला तरी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या कपड्यांनी (Pink Dress) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पारंपारिक हिराव्या रंगाचे कपडे सोडून दक्षिण आफ्रिकेने (South Africa) गुलाबी रंगाचे कपडे का घातले हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुलाबी रंगाच्या कपड्यांचं हे आहे कारण
पिंक वन डे (Pink ODI) सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पिंक रंगाचे कपडे परिधान करुन मैदानावर उतरता. यामागचं कारणही खूपच खास आहे. ब्रेस्ट कॅन्सरविरोधात (Breast Cancer) लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिका संघाचा हा उपक्रम असतो. क्रिकेट साऊथ आफ्रिका या सामन्यासाठी खास तिकिटही जारी करतात. विशेस म्हणजे बोर्डाकडून स्टेडिअममध्ये सामना पाहण्यासाठी येणऱ्या क्रिकेट चाहत्यांना गुलाबी रंगाची जर्सी परिधान करुन येण्याचं आवाहन केलं जातं. या सामन्यातून मिळणारं सर्व उत्पन्न हे ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित योजनांसाठी दिलं जातं. 


दक्षिण आफ्रिकेने भारताविरोधाता गुलाबी जर्सीत खेळण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी तब्बल 11 सामने असे झाले आहेत. गुलाबी जर्सीमध्ये खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 9 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल आहे. 2015 मध्ये वेस्टइंडिजविरोधात पिंक वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिलिव्हर्सने इतिहास रचला होता. डिव्हिलिअर्सने अवघ्या 31 चेंडूत दमदार शतक ठोकलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमधलं हे सर्वात जलद शतक ठरलं होतं. 


अर्शदीपची भेदक गोलंदाजी
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 8 विकेटने विजय मिळवत विजयी सलामी दिलीय. पहिली फलंदाजी करणाऱ्या यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 116 धावांत ऑलआऊट झाला. भारताततर्फे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्यात पॉवरप्लेमध्ये चार विकेट घेत आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. या धक्क्यातून आफ्रिका सावरलीच नाही. ठरावित अंतराने दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले. अर्शदीप सिंगने 47 धावां देत पाच विकेट घेतल्या. तर आवेश खानने 4 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. कुलदीप यादवला एक विकेट मिळाली.