India Playing 11 vs Sri Lanka 1st T20 : भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर (Team India Tour of Sri Lanka) असून या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकादरम्यान,  3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.  टी20 मालिकेपासून (India vs Sri Lanka T20 Series) या दौऱ्याची सुरुवात होणार असून पहिला टी20 सामना 27 जुलैला रंगणार आहे. या दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नव्या इनिंगा सुरुवात होणार आहे. टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली असून संघात युवा खेळाडूंनासंधी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे नवे ओपनर्स
प्रशिक्षक आणि गोलंदाजाबरोबर या दौऱ्यात टीम इंडियाला नवी सलामीची जोडीही मिळणार आहे. टी20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. संपूर्ण टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारतीय डावाची सुरुवात केली होती. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात भारतीय डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. पण याचं उत्तर आता समोर आलं आहे. 
टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल आणि डावखुरा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल श्रीलंका दौऱ्यात ओपनिंग करताना दिसणार आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यात शेवटच्या तीन सामन्यात गिल आणि यशस्वीने ओपनिंग केली होती. 


अशी असेल टीम इंडियाचा प्लेईंग इलेव्हन
गिल-यशस्वीनंतर तिसऱ्या क्रमांकावर विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंत खेळालया उतरेल. तर कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर मोर्चा सांभाळेल. यानंतर पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि शिवम दुबे मैदानात उतरतील. 


वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सीराज यांच्यावर असेल. तर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची साथ मिळेल. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांच्यावर फिरकीची मदार असणार आहे. पल्लेकेलची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर कर्णधार सूर्यकुमार तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदरला मैदानावर उतरु शकतो. 


श्रीलंकेच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह/वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर/रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज.


भारताचा टी20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.


भारत-श्रीलंका टी20 सामना, सामने
27 जुलै- पहिला टी20 सामना, पल्लेकेल
28 जुलै- दूसरा टी20 सामना, पल्लेकेल
30 जुलै- तीसरा टी20 सामना, पल्लेकेल