India vs West Indies T20 Series : वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने सात विकेट राखून विजय मिळवला (India vs West Indies T20 Series) आणि पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील आपलं आव्हान कायम ठेवलं. यजमान वेस्ट इंडिजने पहिले दोन सामने जिंकत आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दोन सामने बाकी असून चौथा सामना 12 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. पण याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुढचे दोन्ही सामने वेस्टइंडिजमध्ये खेळवले जाणार असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलैपासून टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये
भारतीय क्रिकेट संघ गेल्या महिन्याभरापासून वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. याआधी भारत (Team India) आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात आले. दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 1-0 अशी जिंकली. तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 5 विकेटने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने 6 विकेटने मातकरत मालिकेत बरोबरी साधली. पण त्रिनिदादमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने तब्बल 200 धावांच्या फरकाने सामना जिंकत मालिकाही जिंकली. 


टी20 मालिकेत पिछाडिवर
कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी20 मालिकाहा भारत सहज जिंकेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. पण विंडिजने पहिले दोन सामने जिंकत आघाडी घेतली. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत विंडीजच्या विजयाची हॅटट्रीक रोखली. मालिकेतील आणखी दोन सामने बाकी आहेत. पण हे दोनही सामने आता वेस्टइंडिजच्या बाहेर खेळवले जाणार आहेत. अमेरिकेतल्या फ्लोरिडा (USA Florida) इथल्या लॉडरहिलमध्ये हे सामने रंगणार आहेत. 12 ऑगस्टला चौथा सामना खेळवला जाणार आहे. तर 13 ऑगस्टला पाचवा सामना रंगेल. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल


सूर्यकुमार आणि तिलक फॉर्मात
तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तब्बल सात विकेटने वेस्टइंडिजवर मात केली. सूर्याने फक्त 44 चेंडूत सूर्याने 83 धावांची खेळी केली. यात त्याने 10 चौकार आणि चार षटकार लगावले. तर तिलक वर्माने सलग दुसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी करत नाबाद 49 धावा केल्या.  वेस्टइंडिजने विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान तीन विकेटच्या मोबदल्यात पार केलं