India vs South Africa Test Series : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांदरम्यान टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आलीय. तीन सामन्यांच्या टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकत इतिहास रचला. आता दोन्ही संघांदरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 26 डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळए कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीही भारतात परतला
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसुद्धा दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. कौटुंबिक कारणास्तवर तो तडकाफडकी भारतात आला त्यामुळे प्रिटोरियातील तीन दिवसांच्या इंट्रा-स्क्वॉड गेममध्येही तो सहभागी होऊ शकला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहली 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या सेंच्युरिअन कसोटी सामन्यापुर्वी जोहानसबर्गमध्ये परतेल. विराट कोहली तीन दिवसांपूर्वीच मुंबईत परतला आहे. यासाठी त्याने बीसीसीआयची पूर्व परवानगी घेतली आहे. 


ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त
26 वर्षांचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋतुराजच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. यातून अद्याप तो पूर्णपणे बरा झालेला नाही.


मोहम्मद शमीही मालिकेतून बाहेर
दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याआधीच कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. विश्वचषक स्पर्धेत शमीने 24 विकेट घेत खळबळ उडवून दिली होती. पण फिटनेसमुळे बीसीसीआयच्या वैदयकीय टीमने शमीला कसोटी मालिकेत खेळण्यास अनुमती दिली नाही. भारताचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनही वैयक्तिक कारणामुळे या कसोटी मालिकेत खेळणार नाहीए.


दक्षिण आफ्रिकेसाठी भारताचा क्रिकेट संघ  
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.


भारताचं दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक
26 ते 30 डिसेंबर, पहिला कसोटी सामना, सेंचुरियन 
3 ते 7 जानेवारी, दूसरा कसोटी सामना, जोहानसबर्ग


भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी रेकॉर्ड
एकूण कसोटी सामने : 42
भारत विजयी : 15
दक्षिण आफ्रिका विजयी : 17
ड्रॉ : 10