पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
India vs Afghanisatan 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान 3 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी0 सामना आज खेळवला जात आहे. पंजाबमधल्या मोहाली स्टेडिअमवर (Mohali Stadium) हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. सामना सुरु होण्यासाठी काही तास बाकी असतानाच टीम इंडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगावने व्हायरल (Viral Video) होत आहेत. या व्हिडिओत अक्षर पटेल, शुभमन गिल, रिंकू सिंग, प्रशिक्षक राहुल द्रविड दिसत आहेत. या सर्वांची अवस्था वाईट झाल्याचं दिसतंय.
काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत टीम इंडियातले काही खेळाडू दिसत आहेत. बीसीसीआयने (BCCI) हा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. वास्तविक मोहातील्या कडाक्याच्या थंडीने टीम इंडियातले खेळाडू हैराण झाले आहेत. मोहालीत सध्या कड्याक्याची थंडी असून या थंडीत भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सराव करताना दिसताय. अंगात जॅकेट, डोक्यावर कानटोपी आणि हातात ग्लोव्ह्ज घालून खेळाडू सराव करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातील अक्षर पटेल बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला मोहालीतलं टेम्परेचर किती आहे हे विचारताना दिसतोय. यावर तो व्यक्ती 12 अंश सेल्सिअस असल्याचं सांगतो. यावर अक्षर पटेल वातावरण सहा अंश सेल्सिअस असल्याासारखं वाटत असल्याचं सांगतो.
अक्षर पटेल हा गुजरात राज्यातला आहे, आपल्या राज्यात इतकी थंडी नसल्याचं तो सांगताना दिसतो, अशीच परिस्थिती प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीही झालीय. राहुल द्रविड यांना बंगळुरुच्या वातावरणाची आठवण झाली. रिंकू सिंगही थंडीच्या कडाक्यापासून वाचलेला नाहीए. आताच केरळातून खेळून आलो, तिथे गरम वातावरण होतं, आणि आता मोहालीत कुडकुडणारी थंडी असल्याचं रिंकू सिंग सांगताना दिसतोय. तर शुभमन गिलही 7 डिग्री सेल्सिअसमध्ये असल्यासारखं वाटत असल्याचं म्हणतोय.
टीम इंडियातल्या अर्शदीप सिंगची परिस्थिती मात्र नेमकी उलटी आहे. 12 अंश सेल्सिअस वातावरणातही अर्शदीपने आपल्याला गरम होत असल्याचं सांगितलं. गरम होत असल्याने आपण टीम शर्टमध्ये फिरत असून थोडी थंडी असती तर बरं झालं असतं असं म्हणताना तो दिसतोय.
टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन?
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान पहिल्यांदाच टी20 मालिाक खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यातून स्टार फलंदाज विराट कोहली खेळणार नाहीए. मुलगी वामिका आज जन्मदिवस असल्याने आजच्या सामन्यात खेळणार नाहीए, पण दुसऱ्या टी20 सामन्यासाठी तो उपलब्ध असणार आहे. अशात टीम इंडियाच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल करण्याची शक्यता आहे. तर विराटच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजीला मैदानात उतरु शकतो. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा तर पाचव्या क्रमांकावर विकेटकिपर जितेश शर्मा फलंदाजीला मैदानात उतरेल. तर सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंग खेळणअयाची शक्यता आहे. याचा अर्थ पहिल्या टी20 सामन्या संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
ऑलराऊंडर अक्षर पटेल सातव्या तर आठव्या क्रमांकावर कुलदीप यादव मैदानात उतरेल. याशिवाय अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमारवर वेगवान गोलंदाजीची मदार असेल.
अफगाणिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.