India vs England, Rajkot Stadium : भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच रंगतदार ठरतेय. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा (Team India vs England) 28 धावांनी पराभव केला आणि मालिकेत आघाडी घेतली. पण टीम इंडियाने या पराभवाचा बदला दुसऱ्या म्हणजे विशाखापट्टणम कसोटीत घेतला. टीम इंडियाने इंग्लंडवर तब्बल 106 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच पाच सामन्यांची मलिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता भआरत-इंग्लंड दरम्यानचा तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकात मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकोट स्टेडिअमचं नाव बदलणार
भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीआधी एक मोठा बदल होणार आहे. राजकोटच्या (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमचं नाव कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे 14 फेब्रुवारीला बदलणार आहे. या स्टेडिअमचं नवं नाव माजी प्रथम श्रेणई क्रिकेटर आणि अनुभवी प्रशासक निरंजन शाह यांच्या नावावर ठेवलं जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह राजकोटच्या नव्या निरंजन शाह स्टेडिअमचं (Niranjan Shah Stadium) उद्घाटन करणार आहे. राजकोट स्टेडिअमचे सचिव हिमांशु शाह यांनी मीडियाला ही माहिती दिली आहे. 


14 फेब्रुवारीला खास कार्यक्रम
राजकोट स्टेडिअमच्या नामकरण सोहळ्याला बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या कार्यक्रमात काही खेळाडूही सहभागी होण्याची शक्यता आहे. 


कोण आहेत निरंजन शाह?
निरंजन शाह हे सौराष्ट्रचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी सौराष्ट्रसाठी 12 प्रथम श्रेणी सामने खेळलेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी त्यांनी तब्बल 40 वर्ष काम केलं. बीसीसीआयच्या सचिवपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. याशिवाय नॅशनल क्रिकेट अकादमी बंगळुरुत ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 


राजकोटच्य सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमला निरंजन शाह यांचं नाव देण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये एका बैठकीत ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला होता. 


राजकोट स्टेडिअमवर भारताचा रेकॉर्ड
भारतीय क्रिकेट संघाने राजकोट स्टेडिअमवर पहिला कसोटी सामना 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. हा सामना ड्रॉ झाला. या मैदानावरा इंग्लंड संघाचा हा एकमेव कसोटी सामना आहे. 2018 मध्ये भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने एक इनिंग आणि 272 धावांनी सामना जिंकला. या सामन्यातून पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कसोट सामन्यात पदार्पण केलं होतं.