Rohit Sharma Video : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंडदरम्यान पहिला कसोटी (Ind vs Eng Test) सामना खेळवला जात आहे. टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला. भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या बॅझबॉल रणनितीच्या (Bazball) चिंधड्या उडाल्या. भारताच्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट तर अक्षर पटेलने दोन विकेट घेतल्या. यानंतर भारतीय संघ (Team India) फंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली. पण रोहित शर्मा 24 धावांवर बाद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षेत मोठी चूक
या सामन्यावेळी सुरक्षेत मोठी चूक पाहिला मिळाली. एक क्रिकेट चाहता सुरक्षा कडं तोडून तेट टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मापर्यंत पोहोचला. हा फॅनने रोहितकडे जाऊन त्याच्या पाया पडला. त्यानंतर सुरक्षांनी त्याला अटक करत मैदानातून बाहेर नेलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


या चाहत्याने विराट कोहलीच्या नावाची जर्सी परिधान केली होती. अज्ञात चाहत्याने रोहित शर्माच्या पायाला हात लावला. यावेळी रोहित शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चाहता थेट मैदानात घुसरल्याने सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. 



इंग्लंडचा पहिला डाव
हैदराबाद कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पण भारताच्या फिरकी त्रिकुटासमोर इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला. कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. यात त्याने 6 चौके आणि 3 षटकार लगावले. भारतातर्फे अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 


भारतीय प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


इंग्लंडची प्लेइंग-11: जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जॅक लीच.