टीम इंडियावर नवं संकट! विराट कोहलीनंतर स्टार फलंदाज इंग्डंलविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवण्यात आले असून तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. पण त्याआधीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीनंतर आणखी खेळाडू मालिकेतून बाहेर पडलाय.
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जातेय. यातले दोन सामने खेळवण्यात आले असून तीन सामने शिल्लक आहेत. पण त्याआधीच टीम इंडियावर (Team India) नवं संकट ओढावलं आहे. स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) संपूर्ण मालिकेत खेळणार नाहीए. त्यापाठोपाठ आता आणखी एक फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडिया मोठा धक्का बसलाय. याआधीच मोहम्मद शमी, विराट कोहली, रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर झालेत.
स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर
टीम इंडियाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. श्रेयस अय्यरच्या पाठिची दुखापत बळावली आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरीत तीन सामने तो खेळू शकणार नाही. हैदराबाद आणि विशाखापट्टणम कसोटीत श्रेयर अय्यरचा प्लेईंग-11 मध्ये समावेश आहे. पण दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडिया व्यवस्थापनशी आपल्या दुखापतीबद्दल चर्चा केली. खेळपट्टीवर जास्तवेळ फलंदाजी करताना पाठिवर ताण येत असल्याचं त्याने संघ व्यवस्थापनाला कळवलं आहे. मोठी फटकेबाजी करताना अय्यरच्या पाठिवर आणि मनगटावर जोर येत आहे.
गेल्या वर्षी झाली होती शस्त्रक्रिया
श्रेयस अय्यरला पाठिच्या दुखापतीची समस्या जुनीच आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या समस्यामुळे तो काही सामने खेळू शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यालाही तो मुकला होता. त्यानंतर कसोटी मालिकेत त्याचं टीम इंडियात पुनरामन झालं, पण पाठिच्या दुखापतीमुळे तो मैदानावर उतरु शकला नाही. अखेर त्याच्या पाठिवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आयपीएल 2023 मध्ये तो खेळू शकला नाही.
बीसीसीआयन दिलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरला पन्हा एकदा पाठिची दुखापत जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पुढच्या तीनही सामन्यात श्रेयस अय्यरच्या खेळवण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यावर बंगळुरु क्रिकेट अकादमीत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. आयपीएलमपर्यंत श्रेयस अय्यर फिट होईल अशी शक्यता आहे.
श्रेयस अय्यरची निराशाजनक कामगिरी
श्रेयस अय्यरची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत समाधानकारक कामगिरी झालेली नाही. श्रेयस अय्यरने दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात केवळ 104 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या कसोटी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच होती. श्रेयस अय्यर बाहेर झाल्यास युवा खेळाडूला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. अशात युवा फलंदाज सर्फराज खानचं पदार्पण होऊ शकतं.