India vs Pakistan, Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेत सुपर-4 चा थरार सुरु आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानाचा (India beat Pakistan) तब्बल 228 धावांनी धुव्वा उडवला. क्रिकेटच्या इतिहासात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारताच्या विजयामुळे सुपर-4 पॉईंटटेबलची (Point Table) चुरसही वाढली आहे. यात क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) तिसऱ्यांदा आमने सामने येऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत अंतिमफेरीत पोहोचणार?
एशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान भिडतील अशी शक्यता वर्तवली जातेय. 17 सप्टेंबरला कोलंबोत अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सुपर-4 मध्ये दुसऱ्या सामन्यात भारताची गाठ श्रीलंकेशी पडतेय. हा सामना जिंकल्यास टीम इंडियाची अंतिम फेरीतील जागा निश्चित होईल. तर पाकिस्तानलाही सुपर-4 च्या शेवटच्या सामन्या श्रीलंकेचा पराभव करावा लागेल असं झाल्यास भारत-पाकिस्तानमध्ये जेतेपासाठी लढत रंगेल.


सुपर-4 पॉईंट टेबल


भारत  -  1 सामना  - 2 पॉइंट,   4.560 नेट रनरेट
श्रीलंका  -  1 सामना  - 2 पॉइंट,   0.420 नेट रनरेट
पाकिस्तान  -  2 सामना  - 2 पॉइंट,  -1.892 नेट रनरेट
बांग्लादेश  -  2  सामना  - 0 पॉइंट,   -0.749 नेट रनरेट


टीम इंडियाचे आणखी दोन सामने
पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सुपर-4 मध्ये टीम इंडियाला आणखी दोन सामना खेळायचे आहे. यातला दुसरा सामना आज श्रीलंकेबरोबर खेळवला जातोय. तर तिसरा सामना 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध होईल. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान 14 सप्टेंबरला सामना खेळवला जाईल. 


भारत-पाकिस्तान समीकरण
-  सुपर-4 मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर मात केल्यास भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. भारताचा बांगलादेशविरुद्धचा सामना केवळ औपचारीक असेल
- पाकिस्तानला सुपर-4 मधला शेवटचा सामना 14 सप्टेंबरला खेळायचा आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. पाकिस्तानने हा सामना जिंकल्यास अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना भारताशी होईल
- पाकिस्तान-श्रीलंकेताल सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 3 पॉईंट जमा होईत. मग नेट रनरेट पाहिला जाईल. सध्याच्या परिस्थितीत लंकेचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. 
- श्रीलंकेने भारताचा पराभव केल्यास, तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत पोहोचण्याची टीम इंडियाला संधी असेल. तर पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल.


एशिया कपसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा


एशिया कपसाठी पाकिस्तान टीम: अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, सऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, शादाब खान (उप-कर्णधार) , मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अशरफ, हॅरिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह ,शाहीन शाह आफरीदी.