दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 ठरली... गिलऐवजी `हा` खेळाडू करणार पदार्पण
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाण आहे. बुधवारी म्हणजे 3 जानेवारीला होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरु होईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियात 1-0 ने पिछाडीवर आहे.
IND vs SA Pitch Report, Playing 11 & Live Streaming : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना येत्या बुधवार म्हणजे 3 जानेवारीपासू खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये रंगणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरु होईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया (Team India) 1-0 अशा पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा एक इनिंग आणि 32 धावांनी लजीरवाणा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
शुभमन गिलऐवजी हा खेळाडू करणार पदार्पण
दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा बदल पाहिला मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सपशेल अपयशी ठरला होता. त्याने केवळ 26 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. वेस्टइंडिज दौऱ्यातही गिल फ्लॉप ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून गिलची गच्छंती जवळपास निश्चित मानली जातेय.
शुभमन गिलऐवजी संघात अभिमन्यू ईश्वरनला (Abhimanyu Easwaran) संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने अभिमन्यू ईश्वरनला दक्षिण आफ्रिकेत बोलावण्यात आलं. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अभिमन्यूने दमदार कामगिरी केली आहे. 89 सामन्यात अभिमन्यूने तब्बल 22 शतकं झळकावली आहेत. त्याच्या नावावर 6585 धावा जमा आहेत. याआधी अभिमन्यूला दोन वेळा टीम इंडियात संधी देण्यात आली होती. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
केपटाऊनचं पिच कसं आहे?
केपटाऊनची खेळपट्टी वेग आणि बाऊन्ससाठी ओळखली जाते. खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार आहे. परिणामी फलंदाजांची या खेळपट्टीवर कसोटी लागणार आहे. टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी निवडण्याची शक्यता आहे. नव्या चेंडूमुळे गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.
कुठे पाहाल लाईव्ह सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात. तर डिज्नी प्लस हॉटस्टारवर यांच लाईव्ह स्टिमिंग केलं जाणार आहे. पण डिज्नी प्स हॉटस्टारवर सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे.
भारताची संभाव्या प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, अभिमन्यु ईश्वरन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11
टोनी डी जोरजी, डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्कराम, कीगन पीटरसन, डेविड बेडिंघम, वियान मुल्डर, काइल वेरिन (विकेटकीपर), मार्को जेनसन, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्जी, नांद्रे बर्गर