India Vs West Indies 1st T20 Playing-11: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (India vs West Indies) पाच सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) रंगणार आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाची धुरा अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर असणार आहे. टी20 सीरिजसाठी भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. तर अशा चार युवा खेळाडूंना संधी देण्यात आली देण्यात आली आहे, जे पहिल्यांदाच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहेत. यात शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा आणि वेगवागन गोलंदाज मुकेश कुमार यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजू सॅमसन कि ईशान किशन?
यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्माला संधी मिळाली तर ते आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करतील. यशस्वी आणि तिलक वर्माने आयपीएलचा सोळावा हंगाम आपल्या बॅटने गाजवला आहे. पण कर्णधार हार्दिक पांड्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते विकेटकिपर म्हणून कोणाची निवड करायीच याचं. ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. आता हार्दिक पांड्या यातल्या कोणाला संधी देतो, हे थोड्याचेवळात स्पष्ट होईल. 


तिसरी मालिका जिंकण्मयासाठी सज्ज
वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडिया सलग तिसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. याआधी टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 तर एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली आहे. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ टी20 मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. 


टी20 क्रिकेटमध्ये वेस्टइडिजच्या तुलनेत भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे. दोनही संघाता आतापर्यंत 8 टी20 मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यातल्या तब्बल सहा मालिका भारताने जिंकल्यात. तर 2 मालिका वेस्ट इंडिजने पटकावल्या आहेत. 2016 आणि 2017 मध्ये सलग दोन टी20 सीरिज विंडिजने जिंकल्या होत्या. पण त्यानतंर भारताने विंडिजविरुद्ध सलग पाच टी20 मालिका जिंकत विक्रम रचला. ही मालिका जिंकल्यास सलग सहावा विजय ठरणार आहे. 


संभाव्य प्लेईंग 11


भारतीय टीम: शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ईशान किशन/संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल/रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार/उमरान मलिक/आवेश खान.


वेस्टइंडीज टीम: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स/शाई होप (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरोन हेटमायर, रोवमॅन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेज, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड/ओडियन स्मिथ, अकील हुसैन आणि अल्जारी जोसेफ.