India vs Zimbabwe 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानचा चौथा टी20 सामना आज हरारे स्टेडिअमवर (Harare) खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत टीम इंजिया 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथा सामना जिंकत मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झालीय. पहिल्या टी20 सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक करत पुढचे दोन्ही सामने जिंकत मालिकेच आघाडी घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी असेल प्लेईंग इलेव्हन
झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियाची (India vs Zimbabwe) प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झालीय. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल करतील. शुभमन आणि यशस्वी संघाला आक्रमक सुरुवात करुन देण्यात माहिर आहेत. 


मधल्या फळीत कोण?
आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी येऊ शकतो. आयपीएलमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अभिषेकने टीम इंडियात एन्ट्री केलीय. दुसऱ्या टी20 सामन्यात सलामीला येत अभिषेकने अवघ्या 46 चेंडूत शतक ठोकत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची पिसं काढली होती. पण तिसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आल्याने अभिषेकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागतंय. 


चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड मैदानावर उतरेल. मधल्या फळीत आक्रमक फटकेाबाजी करत धावसंख्या वाढण्याची जबाबदारी ऋतुराज गायकवाडची असेल. टी20 फॉर्मेटमधल्या आक्रमक फलंदाजांमध्ये ऋतुराजची गणना होते. तर पाचव्या क्रमांकाव विकेटकिपर संजू सॅमसनला संधी मिळू शकते. अखरेच्या षटकात फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी रिंकू सिंहवर असेल. रिंकू सिंह सहाव्या क्रमांकाला फलंदाजीला येईल. 


झिम्बाब्वेविरुध्दच्या चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या ऑलराऊंडरची जबाबादरी सातव्या क्रमांकावर येणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरवर असेल. 


गोलंदाजीची जबाबदारी
फिरकी गोलंदाजीचं डिपार्टमेंट रवी बिश्नोईच्या खांद्यावर असेल. बिश्नोईने आपल्या फिरकीने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना नाकेनऊ आणले आहेत. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मुकेश कुमार, खलील अहमत आणि आवेश खान यांच्यावर आहे.  पहिल्या तीन सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर भारतीय गोलंदाजच आहेत. पहिल्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर, दुसऱ्या क्रमांकावर रवी बिश्नोई आणि तिसऱ्या क्रमांकावर आवेश खान आहेत. तिघांच्या नावावर प्रत्येकी सहा विकेट जमा आहेत. 


अशी आहे भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायसवाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, खलील अहमद, आवेश खान.