Indian Team for NZ Series : श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका (India vs Sri Lanka ODI Series) संपल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडशी (India vs New Zealand Series) दोन हात करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 सीरिजसाठी बीसीसाआयने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी दोन कर्णधारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकदिवसीय संघाची जबाबादारी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) तर टी20 संघाची (T20 Team) जबाबदारी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्याकडे देण्यात आली आहे. काही युवा खेळाडूंनाही संघात अनेपक्षित संधी देण्यात आली आहे. पण या सर्वात एका दिग्गज खेळाडूकडे मात्र बीसीसीयकडून सातत्याने दुर्लक्ष केलं जातं आहे. या खेळाडूने देशाला आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष
भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhavan) न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून धवन खराब फॉर्मचा सामना करतोय. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण यानंतरही धवनचा विचार करण्यात आलेला नाही.


लागोपाठ दोन सीरिजमधून बाहेर 
नव्या वर्षात खेळवलेल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवीस मालिकेतही 37 वर्षांच्या शिखर धवनला संधी देण्यात आली नाही. बांगलादेश दौऱ्यात धवन टीम इंडियात होता, पण त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. तीन एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ 18 धावा करता आल्या. गेल्या पाच सामन्यांचा विचार केला तर धनवच्या नावावर केवळ 49 धावा जमा आहेत. 2011 मध्ये टी20 क्रिकेट सामन्यातून शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.


ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज
2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघात शिखर धवनने प्रतिनिधित्व केलं होतं. महेंद्र सिंग धोणीच्या नेतृत्वाथ टीम इंडियाने इतिहासात रचला होता. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला होता. या सामन्यात शिखर धवनने रोहित शर्माबरोबर ओपनिंग केली होती. 24 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाच्या मदतीने धवनने 31 धावा केल्या होता. पूर्ण स्पर्धेत धवनने 363 धावा केल्या आणि मॅन ऑफ द सीरिजचा खिताबही पटकावला.


धवनची क्रिकेट कारकिर्द
शिखर धवनाची क्रिकेट कारकिर्द जोरदार राहिली आहे. टीम इंडियासाठी क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये खेळताना शिखरने एकूण दहा हजार धावा केल्या आहेत. यात 34 कसोटी सामन्यात 2315 धावा, 167 एकदिवस सामन्यात 6793 धावा केल्या आहेत. तर 68 टी20 सामन्यात त्याच्या खात्यात 1759 धावा जमा आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 8499 धावा केल्या आहेत.