IPL 2024 Date : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2024 )नव्या हंगामाबाबत महत्त्वाची माहिती समोल आली आहे. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात 22 मार्च 2024 पासून होऊ शकते, तर आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाईल. महिला प्रीमिअर लीगच्या (WPL) पाच दिवसांनी आयपीएलला सुरुवात होईल. महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम 22 फ्रेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. डब्ल्यूपीएलचे सामने दिल्ली, बंगळुरु आणि दिल्लीत आयोजित करण्यात आले आहेत. बीसीसीआयकडून येत्या दोन दिवसात डब्ल्यूपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल
आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा निवडणुकींच्या (Loksabha Election 2024) तारखांनंतर घोषित केलं जाईल. 22 मार्च ते 26 मेदरम्यान आयपीएलचं आयोजन करण्यावर बीसीसीआय (BCCI) विचार करतंय. पण निवडणुक तारखांनंतर स्पर्धेची घोषणा होईल. आयपीएल स्पर्धा भारतातच खेळवण्यावर बीसीसीआय ठाम आहे. 2019 मध्ये आयपीएल आणि लोकसभा निवडणूक एकाच काळात होती. पण बीसीसीआयने स्पर्धेचं नियोजन केलं होतं. ज्या राज्यात निवडणुकीचा टप्पा होता, त्या राज्यातील सामने इतर राज्यात खेळवण्यात आले होते. त्याआधी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. 


भारत-इंग्लंड कसोटी मालिका
दरम्यान, भारतीय खेळाडू सध्या इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांची मालिकेसाठी तयारी करत आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान 25 जानेवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडशी दोन हात करेल. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी आणि विकेटकीपर ईशान किशनला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तर युवा विकेटकिपर ध्रुव जुरेलचं टीम इंडियात पदार्पण झालं. 


पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार ), आवेश खान.


इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, शोएब बशीर, जैक क्राउली, बेन डकेट, बेन फोक्स, डॅन लॉरेंस, टॉम हार्टली, जॅक लीच, ओली पोप, ओली रोबिंसन, जो रूट आणि मार्क वुड. 


भारत  Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : 25-29 जानेवरी, हैदराबाद
दुसरा कसोटी सामना : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम 
तिसरा कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथा कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची 
पाचवा कसोटी सामना : 7-11 मार्च, धर्मशाला