IPL 2025 Teams Retention List : इंडियन प्रीमिअर लीगचा 18 वा हंगाम वेगळा आणि चुरशीचा होणार आहे. मेगा ऑक्शननंतर सर्व दहा संघांचा चेहरा बदलणार आहे. बीसीसीआयने (IPL) सर्व आयपीएल संघांना (IPL Teams) आपली रिंटेशन यादी (Retention List) सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे. आता केवळ 24 तासांचा अवधी राहिला आहे, पण अद्याप कोणत्याही संघाने यादी जाहीर केलेली नाही. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त सहा खेळाडू संघात कायम ठेवण्याची परवनगी आहे.  कोणते खेळाडू रिटेन करायचे आहेत, आणि कोणत्या खेळाडूंवर राईट टू मॅच कार्ड लावायचं आहे याची संपूर्ण मुभा त्या संघाला असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेगा ऑक्शनआधी सर्व संघ कोणते खेळाडू रिटेन करायचे याची रणनिती आखत आहेत. तसंच मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूंवर बोली लावायची याचीही तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे यावेळच्या मेगा ऑक्शनमध्ये काही दिग्गज खेळाडूही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विराट सोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी या खेळाडूंचं काय होणार याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आयपीएलमधले दहा संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात यावर एक नजर टाकूया.


चेन्नई सुपर किंग्स (CSK)
रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, एमएस धोनी (अनकॅप्ड), समीर रिझवी (अनकॅप्ड),


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)
विराट कोहली, मोहम्मद सिराज, यश दयाल, ग्लेन मैक्सवेल


मुंबई इंडियन्स (MI)
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा


गुजरात टाइटंस (GT)
शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, मोहित शर्मा (अनकॅप्ड)


दिल्ली कॅपिटल्स (DC)
ऋषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जॅक फ्रेजर मॅकगर्क


पंजाब किंग्स (PBKS)
शशांक सिंह, सॅम करन, आशुतोष शर्मा, अर्शदीप सिंह


लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
निकोलस पूरन, मयंक यादव, रवि बिश्नोई, आयुष बदोनी (अनकॅप्ड)


सनरायजर्स हैदराबाद (SRH)
हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, पॅट कमिन्स, ट्रेविस हेड


राजस्थान रॉयल्स (RR)
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संदीप शर्मा (अनकॅप्ड)


कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
सुनील नरेन, रहमनुल्लाह गुरबाज, रिंकू सिंह, हर्षित राणा