धोनीला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास, 7 दिवस टेंटमध्ये राहिला, पण थालाने ढुंकूनही पाहिलं नाही
धोनीचा असाच एक जबरा फॅन त्याच्या थालाला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून दिल्लीहून रांची येथे पोहोचला.
MS Dhoni Fan Cycle From Delhi To Ranchi To Meet Thala : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्याला 5 वर्ष झाली आहेत. परंतु तरीही धोनीची फॅन फॉलोईंग कमी झालेली नाही. धोनीची एक झलक मिळण्यासाठी त्याचे फॅन्स गर्दी करतात. धोनीचा असाच एक जबरा फॅन त्याच्या थालाला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून दिल्लीहून रांची येथे पोहोचला. तो जवळपास आठवडाभर धोनीच्या रांची येथील फार्म हाऊस बाहेर टेन्ट उभारून राहिला पण तरीही धोनी त्याला भेटलेला नाही. यावरून नेटकरी आता थेट धोनीला यावरून ट्रोल करत आहेत.
धोनीने कार थांबवली नाही :
गौरव कुमार असं या फॅनचं नाव असून तो दिल्ली येथे राहणारा आहे. यापूर्वी सुद्धा धोनीला भेटण्यासाठी गौरव कुमार चेन्नई सुपरकिंग्सची मॅच दरम्यान रांची येथे आला होता. परंतु त्याला धोनीला भेटता आले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीहून रांची येथे जवळपास 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून रांची येथे धोनीच्या आलिशान फार्म हाऊस बाहेर पोहोचला. तब्बल 7 दिवस तो धोनीच्या फार्म हाऊस बाहेर टेन्ट लावून राहत आहे परंतु अद्याप त्याला धोनी भेटलेला नाही. या दरम्यान दोनवेळा धोनी कार घेऊन घराबाहेर पडताना त्याला दिसला. धोनीने त्याला गाडीतून हात दाखवला पण त्याच्याकडे पाहिले नाही तसेच त्याला भेटण्यासाठी थांबलाही नाही.
मात्र आता यावरून लोक धोनीला ट्रोल करत आहेत. एक युजरने म्हंटले, " आता धोनीला हिरो म्हणणं बंद करा", जयकी यादव या यूजरने म्हंटले की, "अरे ओ धोनी धोनी म्हणणाऱ्यांनो आता तुमच्या धोनीचा खरा चेहरा बघा. अशा अहंकारी लोकांचे फॅन बनू नये, हे लोक PR द्वारे आपली प्रतिमा पॉलिश करतात तर प्रत्यक्षात ते खूप अहंकारी असतात".