Cricket News : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 20 सप्टेंबरपासून तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. अॅरॉन फिंचच्या (aaron finch) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया टीम भारताच्या दौऱ्यावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला टी20 सामना मोहालीत (Mohali) खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज (road safety world series 2022) आणि लीजेंड्स लीग क्रिकेट (legends league cricket 2022 ) सारख्या स्पर्धा खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनही (Mitchell Johnson) भारत दौऱ्यावर असून लीजेंड्स लीग स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. जॉन्सन इंडियन कॅपिटल्समधून (india capitals team) खेळत आहे. 


जॉन्सनच्या रुममध्ये नेमकं काय घडलं?
दरम्यान मिचेल जॉन्सनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन (Instagram) एक फोटो शेअर केला आहे. जो बघून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. जॉन्सन ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे. त्या हॉटेलच्या रुममध्ये एक विषारी साप (snake) आढळला. जॉन्सनने त्या सापाचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या फोटोबरोबर त्याने हा कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या जातीचा साप आहे? असा प्रश्न विचारला आहे. 


जॉन्सनने त्या सापाचे अगदी जवळून फोटो काढले असून ते शेअर केले आहेत. त्यात त्याने लिहिलंय 'या सापाचा एका चांगला फोटो काढला आहे, पण मला कळत नाहीए की नक्की हा कोणता साप आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात मनोरंजक दौरा' असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलंय.



जॉन्सनचा टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्निचिन्ह
मिचेल जॉन्सनने नुकतंच टीम इंडियाच्या (Team India) निवडीवर प्रश्न उपस्थित केला होता. संघात एक ऑलराऊंडर, दोन स्पिनर आणि चार वेगवागन गोलंदाजांची निवड करत असाल तर ते थोडं जोखिमेचं ठरू शकतं. पण टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन वेगवान गोलंदाज, दोन स्पिनर्स आणि एक ऑलराऊंडर खेळवल्यास संघाला फायदेशीर ठरेल. 


लीजेंड्स लीगमध्ये दमदार कामगिरी
सध्या सुरु असलेल्या लीजेंड्स लीगमध्ये मीचेल जॉन्सन दमदार कामगिरी करतोय. गुजरात जायंट्सविरुद्धच्यासामन्यात मिचेलने गुजरात जायंट्स कर्णधार वीरेंद्र सेहवागला झटपट पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला होता.