कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेशच्या फॅनला मारहाण? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं
IND VS BAN 2nd Test Bangladesh Super Fan Beaten: टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चालू सामन्यादरम्यान दरम्यान एक मोठी घटना घडली असून यात बांगलादेश क्रिकेट टीमचा सुपर फॅन टायगर रॉबी (Tiger Roby) याला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली आहे.
IND VS BAN 2nd Test Bangladesh Super Fan Beaten: भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात कानपुर येथे दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चालू सामन्यादरम्यान दरम्यान बांगलादेश क्रिकेट टीमचा सुपर फॅन टायगर रॉबी (Tiger Roby) याला पोलीस हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यात टायगर रॉबी याला काही लोकांनी मारहाण केल्याचे पीटीआयने व्हिडीओ शेअर करून सांगितले होते. मात्र आता उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी वेगळाच खुलासा केला आहे.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत बांगलादेश यांच्यात दुसऱ्या टेस्ट सामन्याला 27 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून तब्बल 280 धावांनी विजय मिळवला होता. मात्र कानपूर येथील टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशच्या सुपर फॅनला काही लोकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशचा सुपर फॅन टायगर रॉबी याला काही लोकांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी रॉबीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टायगर रॉबीच्या या व्हिडिओवर आता उत्तर प्रदेश पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. दैनिक जागरणचे पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी त्यांच्या एक अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर रॉबीला मारहाण करण्यात आलेली नसून त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश चाहत्यावर प्राणघातक हल्ला झाला नसून तो डिहायड्रेशनमुळे आजारी पडला होता. सध्या तो बरा आहे."
हेही वाचा : भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
व्हायरल व्हिडीओ :
भारताची प्लेईंग 11 : यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज
बांगलादेशची प्लेईंग 11 : शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद