मुंबई : Deepak Hooda World Record: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (India vs Zimbabwe) 10 गडी राखून मोठा पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि सलामी जोडीने चमकदार कामगिरी केली. झिम्बाब्वे संघ भारतासमोर टिकू शकला नाही. झिम्बाब्वेची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी पडली. भारताच्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून एक मोठा विश्वविक्रम रचला असून, असे करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. 


दीपक हुडाचा मोठा विक्रम  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक हुडा (Deepak Hooda) याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये अप्रतिम खेळ केला आहे. याच कारणामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. हुडाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी पदार्पण केले. दीपक हुड्डा यांने आतापर्यंत भारतासाठी 15 सामने (9 T20 आणि 6 ODI) खेळले आहेत आणि हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. 


या विक्रमाशी बरोबरी


दीपक हुड्डा (Deepak Hooda) भारतीय संघाकडून जे काही सामने खेळला आहे. या सर्वांमध्ये भारताचा विजय झाला. विश्वविक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, रोमानियन क्रिकेटर सात्विक नादिगोतला हा असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू आहे. त्याच्या पहिल्या 15 सामन्यात रोमानियन संघाने विजय मिळवला होता. मात्र भारताच्या दीपक हुड्डा याने आता या विक्रमाची बरोबरी केली आहे. हुड्डा यांनेही हा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा वनडे सामना 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. 


गोलंदाजी-फलंदाजीशिवाय विक्रम 


झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दीपक हुडा याला गोलंदाजी आणि फलंदाजीची संधी मिळाली नाही. तसेच क्षेत्ररक्षणात त्याने एकही झेल घेतला नाही, तरीही त्याने विश्वविक्रम आपल्या नावावर केला. दीपक हुड्डा यांने आतापर्यंत भारतासाठी 6 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या चार डावात त्याने 115 धावा केल्या आहेत. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 7 डावात 274 धावा केल्या आहेत. त्यात 104 धावांच्या खेळीचाही समावेश आहे.