Shivam Mavi T20 Debut : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Mumbai Wankhede Stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा (India Beat Sri Lanka) चुरशीच्या सामन्यात 1 धावेने पराभव केला. दीपक हुड्डा (Deepak Hoodda) आणि अक्षर पटेल (Axer Patel) यांनी शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी आव्हात्मक धावसंख्या ठेवली. पण या विजयाचा खरा हिरो ठरला तो टीम इंडियात पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवम मावीचा Dream Debut
उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) वेगवान गोलंदाज शिवम मावीसाठी गेले 12 दिवस शानदार राहिले आहेत. 23 डिसेंबर 2022 ला झालेल्या आयपीएलच्या लिलावत (IPL Auction) शिवम मावीवर तब्बल 6 कोटी रुपयांची बोली लागली. त्यानंतर लगेचच त्याला टीम इंडियातून (Team India) बोलावणं आलं. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शिवम मावीला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली. आपल्या पहिल्याच सामन्यात शिवम मावीने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत तब्बल 4 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी हे शानदार पदार्पण ठरलं आहे. 


शिवम मावी होता संधीच्या प्रतीक्षेत
19 वर्षाखालील संघात दमदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज शिवम मावीला टीम इंडियात पदार्पण करण्याची प्रतीक्षा होती. पण टीम इंडियापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास तितकासा सोपा नाही. 140 किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या शिवमला दुखापतींचा सामना करावा लागला. 


पदार्पणात अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात चेंडू शिवमच्या हाती सोपवला. पण शिवमसाठी सुरुवात चांगली झाली नाही. कुशल मेंडिसने 2 चेंडूवर 2 चौकार लगावत त्याचं स्वागत केलं. पण शिवमने हार मानली नाही. पथुम निशांकाला क्लिन बोल्ड करत त्याने पुनरागमन केलं. त्यानंतरत्याने धनंजय डि सिल्व्हाला बाद केलं. तर वानिन्दु हसरंगा आणि महेश तीक्षणा यांनाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 4 विकेट घेतल्या. अशी कामगिरी करणारा टीम इंडियाचा तो तिसरा गोलंदाज आहे. याआधी बरिंदर सरन आणि प्रग्यान ओझाने यांनी अशी कामगिरी केली आहे. 


हे ही वाचा : मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India विमानातला धक्कादायक प्रकार


6 वर्षांपासून प्रतीक्षा
सामन्यानंतर बोलताना शिवम मावी यांनी या क्षणाची आपण 6 वर्षांपासून प्रतीक्षा करत असल्याचं म्हटलं, एकोणीस वर्षाखालील संघात खेळल्यानंतर सहा वर्षांपासून आपण वाट पाहात होतो. त्या सहा वर्षात कठोर मेहनत करावी लागली. दुखापतींचा सामनागही करावा लागला. काही वेळा तर असं वाटलं की टीम इंडियात पदार्पण करण्याचं केवळ स्वप्न राहिल. पण आज माझं स्वप्न साकार झाल्याचं शिवम मावी यांनी म्हटलं.