IND VS BAN : T20 स्टाईल खेळत भारताने अडीच दिवसात जिंकली कानपूर टेस्ट! WTC चं तिकीट जवळपास निश्चित
IND VS BAN Test : पाचव्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून टेस्ट सामना जिंकला. टीम इंडियाने विकेट्स राखून हा सामना जिंकला असून टेस्ट सीरिज सुद्धा 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली आहे.
IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात होती. यापैकी दुसरा सामना हा कानपुरमध्ये खेळवला गेला, यात सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून टेस्ट सामना जिंकला. टीम इंडियाने 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला असून टेस्ट सीरिज सुद्धा 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली आहे. बांगलादेश विरुद्ध सीरिजमध्ये दमदार विजय मिळवल्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट जवळपास निश्चित झालं आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिजमधील पहिला सामना हा चेन्नई येथे खेळवण्यात आला. यात टीम इंडियाने बाजी मारून 280 धावांनी विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सीरिजमधील दुसरा सामना 27 सप्टेंबर पासून आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी या सामन्याला सुरुवात झाली खरी परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 35 ओव्हर खेळून थांबवण्यात आला. यावेळी टीमी इंडियाने बांग्लादेशच्या 3 विकेट्स घेतल्या तर बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस आणि तिसऱ्या दिवशी मैदान ओल असल्याने एकही बॉल न खेळवता त्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला.
हेही वाचा : श्रेयस अय्यरचा दिलदारपणा, भर उन्हात सराव पाहायला आलेल्या गरीब मुलांना दिले कोल्ड्रिंक्स
भारताने अडीच दिवसात जिंकली कानपूर टेस्ट :
चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी बांगलादेशची टीम फलंदाजी करताना टीम इंडियाने त्यांना 233 धावांवर रोखले. टीम इंडियाने फलंदाजी करताना बांगलादेशची आघडी मोडीत काढून 285 धावा केल्या. परंतु 9 विकेट्स गेल्यावर रोहितने फलंदाजांना बोलावून घेतले त्यामुळे 285 धावांवर खेळ आटोपला. यावेळी भारताने अवघ्या 52 धावांची आघाडी घेतली होती तर चौथ्या दिवसाअंती बांगलादेशने पुन्हा फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावून 26 धावा केल्या.
पाचव्या दिवशी बांगलादेशने फलंदाजीला सुरुवात केली मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना फारकाळ मैदानात टिकू दिले नाही. यावेळी बांगलादेशने 10 विकेट्स गमावून 95 धावांची आघाडी घेतली. यावेळी टीम इंडियाकडून गोलंदाज जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या तर आकाश दीपला एक विकेट मिळाली. टीम इंडियाकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना यशस्वी जयस्वालने 51, विराट कोहलीने 29 तर रोहितने 8 आणि गिलने 6 धावा केल्या. टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध 7 विकेट्सने सामना जिंकून टेस्ट सीरिज नावावर केली.
भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज
बांगलादेशची प्लेईंग 11 :
शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद