Shreyas Iyer Irani Trophy : लखनऊच्या एकना स्टेडियमवर मंगळवारपासून ईराणी ट्रॉफी 2024 चा सामना मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ रविवारपासून येथे सरावासाठी उपस्थित होते. यावेळी मैदानात श्रेयस अय्यरने कडक उन्हात सराव पाहण्यासाठी आलेल्या गरीब मुलांना कोल्ड्रिंक्स दिले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून श्रेयसच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
दैनिक भास्करने श्रेयस अय्यरचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. इराणी ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यर आपल्या टीम सह मैदानात प्रॅक्टिस करत होता. यावेळी मैदानाजवळ काही लहान मुलं त्यांचा सराव पाहण्यासाठी आली होती. कडक उन्हामध्ये सराव पाहण्यासाठी आलेल्या मुलांना पाहून श्रेयसला त्यांची दया आली आणि काळजी वाटली. उन्हात मुलांना काहीसा गारवा मिळावा म्हणून श्रेयसने त्यांच्या टीमसाठी आणण्यात आलेले कोल्ड्रिंक्स त्याच्या टीशर्टमध्ये लपवले आणि त्या गरीब मुलांना जाऊन दिले. यावेळी श्रेयस त्यांना म्हणाला 'खूप ऊन आहे कोल्ड्रिंक्स पिऊन तुम्ही मस्तीमध्ये राहा'. श्रेयस अय्यरची ही कृती त्याच्या फॅन्सना भावली आहे. इराणी ट्रॉफीमध्ये श्रेयस मुंबई संघाकडून खेळत असून त्याला रेस्ट ऑफ इंडिया विरुद्धच्या सामन्यात संधी मिळालेली आहे. इराणी ट्रॉफीमध्ये मुंबईची टीम अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळत आहे. श्रेयस अय्यरने यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्येही सहभाग घेतला.
हेही वाचा : क्रिकेट फॅन्ससाठी ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया, पाकिस्तानसोबत होणार मुकाबला
पृथ्वी शॉ, आयुष महात्रे, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोह अवस्थी, एमे जूनद खान.
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार ), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, ईशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सारांश जैन, यश दयाल, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.