IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज सुरु असून यातील पहिला सामना हा बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाने फलंदाजी करताना न्यूझीलंडची 356 धावांची आघाडी मोडीत काढून न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं. आता बंगळुरूमध्ये रविवारी शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 10 विकेट्स तर न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची आवश्यकता असणार आहे.


शेवटच्या दिवशी रंगणार अतितटीची झुंज : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याचा शेवटचा दिवस असेल. 16 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या टेस्ट सामन्यात पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्याचा टॉस सुद्धा होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध लाजिरवाण्या पद्धतीने अवघ्या 46 धावांवर ऑल आउट झाली. त्यानंतर न्यूझीलंडने भारताविरुद्ध तब्बल 402 धावा केल्या. टीम इंडियाकडून रोहित शर्मा, विराट कोहली, सरफराज खान आणि ऋषभ पंतने दमदार कामगिरी करून न्यूझीलंडची ही आघाडी मोडली आणि न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान दिले. 


रविवारी बंगळुरू टेस्टचा शेवटचा दिवस असून यात भारताला विजयासाठी 10 विकेट्स तर न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची गरज असणार आहे. तेव्हा शेवटच्या दिवशी विजयासाठी मोठी लढत होणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचा टेस्ट क्रिकेटमधला इतिहास पाहता न्यूझीलंड मागील अनेक वर्षात भारतात येऊन भारताविरुद्ध एकदाही टेस्ट सामना जिंकलेली नाही. तसेच भारताला पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ८ पैकी चार सामने जिंकावे लागणार आहेत. तेव्हा बंगळुरू टेस्ट सामना भारताला जिंकणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ रविवारी हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. 


हेही वाचा : VIDEO : रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार? चाहत्याने विचारला प्रश्न, हिटमॅननेही दिलं थेट उत्तर


 


भारताची प्लेईंग 11 :


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


न्यूझीलंडची प्लेईंग 11 :


टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके