IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यांच्यातील दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून पहिल्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडने 243 धावांनी आघाडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू टेस्टमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच न्यूझीलंडने तीन सामन्यांची टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. 24 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरी टेस्ट पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. पहिल्या दिवशी झालेला टॉस न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी निवडली. तसेच टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा डेवोन कॉनवे (76) आणि रचिन रवींद्रने (65) केल्या. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाकडून गोलंदाजीच्या डावात आर अश्विनने 3 तर वॉशिंग्टन सुंदर याने 7 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला ऑल आउट करून 259 धावांवर रोखलं. 


हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेची WTC पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, विजयासाठी भारतावर दबाव वाढला


 


न्यूझीलंडची मोठी आघाडी मोडीत काढण्यासाठी टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. मात्र कर्णधार रोहित शर्मा संघासाठी मोठी खेळी करू शकला नाही आणि तो एकही धाव न करता बाद झाला. टीम साऊथीने त्याची विकेट घेतली. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला आणि त्याने 32 बॉल खेळून नाबाद 10 धावा केल्या. टीम इंडियाने दिवसाअखेरीस फलंदाजी करताना 1 विकेट्स गमावून 16 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंड अजूनही  243 धावांनी आघाडीवर आहे. 


वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला लोळवलं : 


25 वर्षीय ऑल राउंडर क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदर याला मागील 3 वर्षात टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नव्हती. वॉशिंग्टन सुंदरने त्याचा शेवटचा टेस्ट सामना हा 2021 मध्ये खेळला होता. मात्र न्यूझीलंड विरुद्ध पुणे टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली. वॉशिंग्टन सुंदरचं हे कमबॅक अतिशय जोरदार ठरलं आणि त्याने पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या तब्बल 7 विकेट्स घेतल्या.  वॉशिंग्टन सुंदरने पहिले रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल यांना बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने  एक तब्बल 7 विकेट्स घेतल्या आणि यामुळेच न्यूझीलंडला 259 धावांवर रोखणं टीम इंडियाला शक्य झालं. 


पुणे टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेईंग : 


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप.