Sachin Tendulkar On Ratan Tata Death : टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा (Ratan Tata) यांनी बुधवारी रात्री ब्रीचकॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं असून त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. 


काय म्हणाला सचिन तेंडुलकर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर लिहिले की, 'रतन टाटा यांनी आपल्या जीवनाने आणि निधनाने देशाला हादरवून सोडले आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळाला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, पण जे लाखो लोक त्यांना भेटू शकले नाहीत त्यांना जे दु:ख वाटतंय तेच दुःख आज मलाही वाटते. त्याचा परिणाम असाच आहे'. 


सचिन पुढे म्हणाला, 'प्राण्यांवरील प्रेमापासून ते त्यांच्या परोपकारापर्यंत, त्यांनी दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण अशा लोकंची काळजी घेतो ज्यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्याचे साधन नाही'. तेंडुलकरने पुढे भावनिक होतं म्हंटले की, 'श्री रतन टाटा तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुमचा वारसा तुम्ही उभारलेल्या संस्था आणि तुम्ही स्वीकारलेल्या मूल्यांद्वारे जिवंत राहील'.


हेही वाचा : महिला चाहत्याला बघून रोहित शर्माने थांबली कार आणि... बघा viral video


 


सचिन तेंडुलकरची पोस्ट : 



क्रिकेटर्सनी व्यक्त केल्या भावना :



केवळ सचिन तेंडुलकरच नाही तर भारताच्या अनेक आजी माजी क्रिकेटर्सनी सोशल मीडियाद्वारे रतन टाटा यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. वीरेंद्र सेहवागने म्हंटले की, 'श्री रतन टाटा जी यांच्या रूपाने आपण भारताचं खरं रत्न गमावलं आहे. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असेल आणि ते आपल्या हृदयात कायम राहतील'. तर 'एक दूरदर्शी, एक आदर्श आणि एक दयाळू  व्यक्ती स्वर्गीय रतन टाटा जी तुमचा वारसा देशभरातील आणि बाहेरील तरुणांना नेहमी प्रेरणा देईल' अशा भावना टीम इंडियाचा ऑल राउंडर हार्दिक पंड्या याने व्यक्त केल्या. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हंटले की, 'सोन्याचं हृदय असलेला माणूस... सर, तुम्ही कायमस्वरूपी स्मरणात राहाल अशी व्यक्ती आहात ज्यांनी इतर सर्वांचे भले करण्यासाठी खरोखर काळजी घेतली आणि आयुष्य जगले'.