Sakshi Dhoni Argue With MS Dhoni : जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डस् आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनदा आयसीसी ट्रॉफी जिंकली. जेव्हा एम एस धोनी मैदानात विकेटच्या मागे उभा राहतो तेव्हा विरोधी संघाच्या फलंदाजाला सजग रहावे लागते. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण  538 सामने खेळले आणि या दरम्यान विकेटकिपर म्हणून 195 स्टॅम्पिंग आणि 634 कॅच पकडले. पण म्हणतात ना तुम्ही कितीही मोठे व्यक्ती झालात तरी बायकोच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. असंच काहीस घडलं जेव्हा पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) क्रिकेटवरून धोनीशी वाद घातला. 


साक्षीने घातला धोनीशी वाद : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर एम एस धोनीच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 123 स्टॅम्पिंग करण्याचा रेकॉर्ड आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात धोनीने एक किस्सा सांगितला. त्याने यात म्हटले की पत्नी साक्षीने स्टॅम्पिंगच्या नियमावरून त्याच्याशी वाद घातला होता. धोनीने म्हटले की, 'आम्ही घरात वनडे मॅच बघत होतो. साक्षी माझ्या सोबत होती. सहसा मी आणि साक्षी क्रिकेटबद्दल बोलत नाही. गोलंदाजाने वाईड बॉल टाकला आणि फलंदाजाने स्टंप आउट केले. मैदानातील अंपायरने थर्ड अम्पायरची मदत घेतली. माझ्या पत्नीने म्हटले की, 'हा आउट नाहीये आणि जो पर्यंत तिने असे म्हटले तो पर्यंत फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. तेव्हा साक्षी धोनीला म्हटली तुम्ही बघा अंपायर फलंदाजाला परत बोलावतील. कारण वाईड बॉलवर स्टंप आउट करू शकत नाही. 


हेही वाचा : एकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक


पाहा व्हिडीओ : 



किस्सा ऐकून प्रेक्षकही हसू लागले : 


धोनीने पुढे म्हटले की, 'मी तिला म्हणाला अग नाही वाईड बॉलवर स्टंपिंग होऊ शकते, पण नो बॉलवर नाही. त्यानंतर साक्षीने म्हटले की, 'तुला काही माहित नाही, तू फक्त बघ, थर्ड अंपायर फलंदाजाला परत बोलावतील. आम्ही जो पर्यंत आम्ही वाद घालत होतो तो पर्यंत फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पोहोचला सुद्धा. आणि तरीही ती म्हणत राहिली 'नाही, नाही, त्यांना त्याला परत बोलवावे लागेल.' मग जेव्हा दुसरा फलंदाज क्रीजवर आला तेव्हा तिने म्हटले की, 'तुला माहितीये की काही तरी गडबड आहे'. हा किस्सा ऐकून सर्व प्रेक्षक हसू लागले.