मुंबई : क्रिकेटच्या जगात असे 6 विश्वविक्रम झाले आहेत, जे मोडणे आता जवळ-जवळ अशक्यच आहे. क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज आणि गोलंदाज झाले आहेत, ज्यांनी आपल्या अफलातून खेळाची मजा द्विगुणित केली. या महान फलंदाज आणि गोलंदाजांनी इतके मोठे विश्वविक्रम केले, जे कोणीही सहजासहजी तोडू शकत नाहीत. चला एक नजर टाकूया क्रिकेट जगतातील असे 6 विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहेत.


1. सचिन तेंडुलकर 100 आंतरराष्ट्रीय शतके


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतके झळकावली आहेत. हा विक्रम मोडणे दुसऱ्या खेळाडूसाठी अशक्य आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके ठोकली असली तरी. मात्र आता 33 वर्षीय विराट कोहलीला 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडणे अशक्य आहे.


सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 हजार 921 आणि कसोटीत 18 हजार 426 धावा केल्या आहेत. सर्व फॉरमॅट्ससह, सचिन तेंडुलकरच्या नावावर एकूण 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 201 विकेट घेतल्या आहेत.


2. सर डॉन ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यात 99.94 सरासरी


क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन (Don Bradman) ने संपूर्ण करिअरमध्ये केवळ 52 कसोटी सामने खेळला आहे. पण, त्याचे फलंदाजीची चर्चा अजूनही कायम आहे. 
डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत कसोटीत 6 हजार 996 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 99.94  इतकी आहे, जी क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च आहे.


हा विक्रम मोडणे सध्याच्या कोणत्याही फलंदाजाला शक्य नाही. इतकेच नाही तर कसोटीत सर्वाधिक 12 द्विशतकेही सर डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहेत. एवढेच नाही तर एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 5028  धावा केल्या आहेत.


3. ब्रायन लाराच्या कसोटी सामन्यात 400 धावा


वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराची क्रिकेटच्या इतिहासातील स्फोटक फलंदाजांमध्ये गणना केली जोते. तो क्रीजवर असेपर्यंत धावफलक सतत हलत असे. ब्रायन लाराने 2004 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद 400 धावा केल्या होत्या. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाही फलंदाजाला एका कसोटी सामन्यात ब्रायन लाराचा हा विश्वविक्रम मोडता आलेला नाही.


आणि भविष्यातही हा विक्रम मोडण्याची चिन्हे नाहीत. इतकेच नाही तर ब्रायन लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद 501 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये कोणत्याही खेळाडूने केलेल्या धावांपैकी या सर्वाधिक धावा आहेत.


4. मुथय्या मुरलीधरनच्या 1300 आंतरराष्ट्रीय विकेट्स


श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1300 विकेट्स घेतल्या आहेत. हा विश्वविक्रम मोडणे कोणत्याही गोलंदाजाला अशक्य आहे. मुथय्या मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीत 133 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि एकूण 1347 बळी घेतले आहेत.


क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज हा मुथय्या मुरलीधरन ठरला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 800 बळी घेतले आहेत. त्याच्या या विश्वविक्रमाच्या जवळपासही पोहोचणे कोणत्याही खेळाडूला शक्य होणार नाही.


5. रोहित शर्माची वनडे सामन्यात 264 धावांची खेळी


भारतीय सलामीवीर आणि जगातील सर्वोत्तम हिटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 264 धावांची खेळी खेळण्याचा विश्वविक्रम आहे. जी कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. एवढेच नाही तर रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 वेळा द्विशतक झळकावले आहे. रोहित शर्माचा हा मोठा विश्वविक्रम मोडणेही अशक्य आहे.


रोहित शर्माने एकाच विश्वचषकात सर्वाधिक (5) शतके झळकावली आहेत. एकाच विश्वचषकात एका फलंदाजाचा सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे.


6. एबी डिव्हिलियर्सचे वनडे शतक फक्त 31 चेंडूत


एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 31 चेंडूत शतक झळकावले होते. त्या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 44 चेंडूत 149 धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत 16 षटकार आणि 9 चौकार लगावले. त्याच्या या आकर्षक खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 148 धावांनी पराभव केला. एबी डिव्हिलियर्सचा 31 चेंडूत वनडे शतकाचा विक्रम मोडणे अद्याप कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नाही.