Team India : T20 World Cup 2022 मध्ये चांगली कामगिरी न करणाऱ्यांना न्यूझीलंड दौऱ्यात आता विश्रांती देण्यात येणार आहे.  कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या सलामीच्या जोडीने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत, परंतु ही सलामीची जोडी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) एकदमच फ्लॉप झाली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलला टीम इंडियातून वगळण्याची मागणी होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुलला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत या दौऱ्यावर या दोघांच्या जागी दोन स्टार खेळाडू सलामीला येऊ शकतात. हे खेळाडू स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. जाणून घेऊया कोण आहे ते खेळाडू. 


T20 World Cupमध्ये रोहित-राहुल जोडी फ्लॉप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसून आलेत. दोघांनाही एका सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर पुढील काही सामन्यांसाठी त्यांची बॅट चाललेली नाही. मोठ्या सामन्यांमध्ये दोन्ही खेळाडू नेहमीच फ्लॉप दिसायचे. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलच्या सामन्यात रोहित शर्माने 27 धावा केल्या, तर केएल राहुलने केवळ 6 धावांचे योगदान दिले. 


स्फोटक फलंदाजीत माहीर


जेव्हा-जेव्हा रोहित शर्मा याला टीम इंडियातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर शुभमन गिल (Shubman Gill) याला सलामीची संधी मिळाली. निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तो खराही ठरला. गिलच्या उत्कृष्ट फलंदाजीचे सर्वांनाच वेड आहे. 23 वर्षीय हा खेळाडू मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने गुजरात टायटन्सला स्वबळावर विजेतेपद मिळवून दिले होते. गिलने भारतासाठी 11 टी-20 सामन्यांमध्ये 579 धावा आणि 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 579 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. 


या खेळाडूने लक्ष वेधले


गेल्या काही काळापासून ईशान किशन (Ishan Kishan) याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. जर त्याने शुभमन गिल याच्यासोबत सलामीला आला तर चांगली जोडी जमेल. त्यामुळे गोलंदाजी करताना विरोधी गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघात इशान किशन याला स्थान दिले आहे. त्याने भारतीय संघासाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 267 धावा, 19 टी-20 सामन्यात 545 धावा केल्या आहेत.