Virat Kohli Connection With Olympics : नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटचा संघ पाठवला अन् पुरूष आणि महिला या दोन्ही संघांनी गोल्ड मेडल खिशात घातलं. त्यामुळे संपूर्ण भारतात जल्लोषाचं वातावरण होतं. अशातच आता ऑलिम्पिक समितीने 2028 साली होणाऱ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता तब्बल 123 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. 1900 मध्ये शेवटचा सामना खेळवला गेला होता. मात्र, 123 वर्षाचा इतिहास घडवण्यात विराट कोहलीचा (Virat Kohli) हात होता का? असा सवाल आता विचारला जात आहे. विराट कोहली अन् ऑलिम्पिकचा कनेक्शन समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 141 व्या सत्रात काही खेळांना समाविष्ट करण्यासाठी मान्यता दिली आहे. ज्यामध्ये स्क्वॅश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस, क्रिकेट आणि फ्लॅग फुटबॉल यांचा समावेश आहे. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी या सर्व खेळाचं स्वागत केलं आणि विराट कोहलीचा उल्लेख केला. त्यामुळे विराट कोहलीमुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झालाय का? असा सवाल विचारला जात आहे. थॉमस बाक यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा (Cricket in Olympics 2028) समावेश करण्यावर झालेल्या चर्चेदरम्यान कोहलीचाही उल्लेख केला. 


काय म्हणाले थॉमस बाक ?


जगातील युवकांसाठी खेळांना उपयुक्त बनवणं गरजेचं आहे. त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑलिम्पिकचा व्यासपीठ असावं. क्रिकेट जगाला एक अनोखं व्यासपीठ उपलब्ध करून देतं. माझा मित्र विराट कोहली याच्या बाबतीत विचार करा,  त्याचे सोशल मीडियावर 314 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तो जगातील तिसरा सर्वाधिक फॉलो केलेला खेळाडू आहेत. असं थॉमस बाक म्हणाले. तुम्हाला माहिती असेल तर, थॉमस बाक देखील विराट कोहलीचे फॅन आहेत. क्रिकेट समावेश करायचा की नको? या मतदानावेळी 99 पैकी फक्त 2 जणांनी विरोध दर्शविला होता. त्यानंनी थॉमस बाक यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला होता.



ऑलिम्पिकला 125 वर्षाचा इतिहास (Olympics Cricket History) आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची सुरूवात 1896 साली झाली होती. मात्र, ऑलिम्पिकच्या इतिहासात फक्त एकदाच क्रिकेटची मॅच झाली होती. 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी 14 देशांपैकी फक्त 4 देशांनी क्रिकेटच्या स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यामध्ये नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन...  नेदरलँड आणि बेल्जियम यांनी आधीच माघार घेतल्याने ऑलिम्पिक स्पर्धेत आत्तापर्यंत फक्त एकच सामना खेळवला गेला आहे. फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात 19 आणि 20 ऑग्सटमध्ये सामना खेळवला गेला होता. ड्रामा आणि वाद यामुळे हा सामना चांगलाच रंगला.


ग्रेट ब्रिटनने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी पहिल्या डावात 117 धावा केल्या. उत्तरा दाखल फ्रान्सचा संघ 78 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात ब्रिटनने 5 बाद 145 धावा केल्या. त्यांनी फ्रान्सपुढे विजयासाठी 185  धावांचे आव्हान दिले. दुसऱ्या डावात फ्रान्सचा फक्त 26 धावांवर डाव संपुष्ठात आला. ही मॅच ब्रिटनने 158 धावांनी जिंकली होती. त्यामुळे ब्रिटनला सुवर्ण तर फ्रान्सला रौप्यपदक मिळालं. तर कांस्यपदाकासाठी टीमच शिल्लक नव्हती. त्यानंतर 1904 पासून एकाही संघाने ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली नाही. तेव्हापासून ऑलिम्पिक सामना खेळवला गेला नाही. आता 123 वर्षांनतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा सामना पहायला मिळणार आहे.