Online Scam : मोबाईलचा वापर जितका वाढला आहे, त्या पेक्षा जास्त प्रमाणात ऑनलाईन फसणवूकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. कधी लिंक पाठवून तर कधी मेसेज पाठवून सामान्यांची बँक अकाऊंटमधून लाखो रुपये लंपास केले जात आहेत. स्वस्त स्मार्ट फोन आणि परडवणारे डेटा किंवा वाय-फाय प्लॅन्स यामुळे एककीकडे आपलं दैनंदिन जीवन सुकर झालं असलं तरी आपल्या ऑनलाईन आर्थिक सुरक्षेसाठीही सतर्क राहायला हवं ही बाब विसरता येणार नाही. फसवणूकी करण्यासाठी स्कॅमर (Scammer) वेगवेगळे मार्ग शोधून काढतात. आता तर चक्क भारताचा लाडका क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्याच (MS Dhoni) नावाने फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिच्या चाहत्यांनो सावधान
एमएस धोनीचे करोडो फॅन्स (Dhoni Fans) आहेत. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी आता या फॅन्सना टार्गेट केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात चक्क महेंद्रसिंग धोनीच्या नावाने पैसे मागण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे ही धोनीचीच पोस्ट असल्याचं भासवण्यासाठी पोस्टमध्ये धोनीचा फोटोही लावण्यात आला आहे. इतकंच नाही तर चेन्नई सुपर किंग्सचा स्लोगनही देण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये फॅन्सकडून सहाशे रुपयांची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इंग्रजी आणि मराठी भाषेत ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  (Online Scam for name of MS Dhoni)


काय म्हटलंय व्हायरल पोस्टमध्ये
सोशल मीडिआवर व्हायरल होणारी ही पोस्ट धोनीनेच शेअर केल्याचा दावा करण्यात आला आहे. यात तो चाहत्यांना अपील करतोय. 'मी रांचीत फसलो असून माझ्याकडे माझं पाकिट नाहीए. घरी जाण्यासाठी मला 600 रुपयांची गरज आहे. फोनपेवर मला पैसे पाठवा. पोहोचल्यावर पैसे परत करु, असं यात लिहिण्यात आलंय. स्कॅमरने 'mahi77i2' नावाच्या हँडलवरन हा मेसेज पोस्ट केला आहे. धोनीचं  'mahi7781' हे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट आहे. फेक पोस्टमध्ये दावा खरा वाटण्यासाठी धोनीचा फोटो आणि चेन्नई सुपर किंग्स स्लोगन 'व्हिसल पोडू'चाही वापर करण्यात आला आहे. 



फॅन्सना पोलिसांचं आव्हान
सोशल मीडियावर धोनीच्या नावाने व्हायरल करण्यात आलेली ही पोस्ट फेक असून यावर कोणीही विश्वास ठेऊ नये आणि पैसे पाठवू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचं फेक अकाऊंट बनवून त्याच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय न घेता खबरदारी बाळगावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय.